स्पोर्ट्स

Sunil Gavaskar IPL 2023 : सूर्यकुमारची चौफेर फटकेबाजी लाजवाब : गावस्कर

मोहन कारंडे

मुंबई; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवची चौफेर फटकेबाजी निव्वळ लाजवाब स्वरूपाची होती. आरसीबीच्या गोलंदाजांची त्याने 'गल्ली क्रिकेट' स्टाईलने केलेली धुलाई अजिबात विसरता येणार नाही, असे प्रशंसोद्गार महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी काढले.

सूर्यकुमारने 35 चेंडूंत 83 ही आयपीएलमधील सर्वोच्च खेळी फटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. त्या पार्श्वभूमीवर गावस्कर बोलत होते. सूर्याच्या या शानदार खेळीत 7 चौकार व 6 खणखणीत षटकारांचा समावेश राहिला.

'सूर्यकुमार यादवने गोलंदाजांची अगदी सफाईदार धुलाई केली. तो आपल्या सहजसुंदर शैलीत खेळतो, त्यावेळी गल्ली क्रिकेटची ती अनुभूती असते. सातत्यपूर्ण सराव व कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने ही उंची गाठली आहे. त्याची बॅटवरील ग्रीप अतिशय उत्तम आहे. यामुळे त्याच्या फटक्यात कमालीची ताकद असते. आरसीबीविरुद्ध लढतीत त्याने प्रारंभी फक्त लाँग ऑन व लाँग ऑफला फटके लगावले. पण, नंतर एकदा सेट झाल्यानंतर त्याने सर्व बाजूंनी फटकेबाजी केली,' असे निरीक्षण गावस्कर यांनी पुढे नोंदवले.

गावस्करांनी यावेळी नेहल वधेराच्या लक्षवेधी योगदानाचाही विशेष उल्लेख केला. नेहल वधेराने या लढतीत 34 चेंडूंत नाबाद 52 धावांचे योगदान दिले. त्याचे हे हंगामातील दुसरे अर्धशतक ठरले. वधेरा व सूर्या यांनी 140 धावांची भागीदारी साकारल्यानंतर मुंबईसाठी विजयाचा मार्ग खुला झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT