भारतीय क्रिकेट संघाने रविवारी रात्री न्‍यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यावेळी सुनील गावस्‍कर यांनी लहान मुलासारखे नाचून आपला आनंद व्‍यक्‍त केला.  (Image source- X)
स्पोर्ट्स

दिल तो बच्चा है जी..! भारताच्‍या विजयानंतर गावसकरांचे सेलिब्रेशन पाहिलंत का? (VIDEO)

sunil gavaskar : चॅमियन्‍स ट्रॉफी वितरण समारंभाचा लुटला मनमुराद आनंद

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी रात्री न्‍यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर देशभरात आनंदला उधाण आलं. सर्वत्र एकच जल्‍लोष सुरु झाला. (new zealand vs india) दुबईतील मैदानावरील स्टँडमधील चाहते आनंद साजरा करत होते आणि दुसरीकडे, टीम इंडिया मैदानावर आनंद साजरा करत होती. याचवेळी सुनील गावस्कर ( sunil gavaskar) हे सामन्यानंतर समालोचनानंतर प्रेझेंटरची जबाबदारी सांभाळत होते; पण टीम इंडियाचा विजय साजरा करण्यासाठी त्यांनी सर्व काही सोडून मैदानावर लहान मुलांसारखे नाचायला सुरुवात केली. त्‍यांच्‍या अनोख्‍या सेलिब्रेशनचा व्‍हिडिओ तुफान व्‍हायरल होत आहे.

सामन्यानंतर ट्रॉफी वितरण समारंभावेळी सुनील गावस्कर मैदानावरून प्रेझेंटरची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी काही काळ ही जबाबदारी सांभाळली. भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी उंचावताच सुनील गावसकरांनी माइक खाली ठेवत आनंदाने नाचू लागले. हे अनोखे सेलिब्रेशन पाहून त्‍यांच्‍याबरोबर असणार्‍या मिताली राज आणि रॉबिन उथप्पा यांनाही सुखद धक्‍का बसला.पण सुनील गावसकरांनी चॅमियन्‍स ट्रॉफी वितरण समारंभाचा मनमुराद आनंद लुटत भारतीय क्रिकेट चाहत्याप्रमाणे विजयाच्या जल्लोष साजरा केला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाने १९८३च्‍या विश्‍वचषक पटकावला होता. या जेतेपदामध्‍ये सुनील गावसकर यांचे मोलाचे योगदान होते. यानंतर त्‍यांनी समालोचकाच्‍या भूमिकेत भारताला आणखी ६ आयसीसी ट्रॉफी जिंकताना पाहिले आहे. २००२ मध्ये, भारताने दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली. तथापि, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दोन दिवस चालला आणि दोन्ही दिवशी कोणताही निकाल लागला नाही, म्हणून भारताने श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली. भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT