Ben Stokes Quits Alcohol : इंग्लंडचा तारांकित अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा मागील काही महिने दुखापतीने त्रस्त होता. मात्र या नकारात्मक गोष्टीकडे त्याने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. दुखापतीवरील उपचार काळापासून त्याने दारू पिणे सोडले आहे. विशेष म्हणजे स्टोक्सने काही दिवसांपूर्वी झिरो अल्कोहोल स्पिरिट्स कंपनी क्लीनकोसोबतची आपली भागीदारी घोषित केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सला गंभीर दुखापत झाली होती. डाव्या हॅमस्ट्रिंगवर डिसेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर डिसेंबर २०२४ पासून स्टोक्स हा क्रिकेटपासून लांब आहे. आता पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी अॅशेस मालिकेसाठी तयार राहण्यासाठी इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने त्याच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीच्या पुनर्वसन दरम्यान दारू पिणे सोडले आहे. याबाबत अनटॅप्ड पॉडकास्टशी बोलताना तो म्हणाला की, "मी या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे २ जानेवारीपासून दारू पिणे सोडले होते. दुखापतीमधून लवकर बरे व्हावे, यासाठी मी हा निर्णय घेतला होता."
माझ्या पहिल्या मोठ्या दुखापतीनंतर, मला धक्का आठवतो आणि मी विचार करत होतो, 'हे कसे घडले?'" स्टोक्सने अनटॅप्ड पॉडकास्टला सांगितले.मला वाटले 'चार-पाच रात्रींपूर्वी आपण थोडेसे मद्यपान केले होते. याचाही आरोग्यावर काही परिणाम झाला आहे का, याचही मी विचार असता पण त्याचा काही उपयोग झाला नसता. मी 'ठीक आहे, मला माझ्या कामात बदल करायला हवा' असेही त्याने सांगितले.
मद्यपानाबद्दलच्या त्याच्या दृष्टिकोनात काय बदल झाला? या प्रश्नावर स्टोक्सने उत्तर दिले की, मला माझ्या कृतीत बदल करायला सुरुवात करायला हवी. मला वाटत नाही की, मी कधीही पूर्णपणे शांत होईन; पण २ जानेवारी २०२५ पासून मी दारुचा एकही थेंब पिलेला नाही. मी स्वतःला बजावले हाेते की, 'माझा दुखापतीवरील उपचार पूर्ण करून मैदानावर परत जाईपर्यंत दारुला स्पर्श करायचा नाही'." स्टोक्सने अलीकडेच झिरो अल्कोहोल स्पिरीट कंपनी क्लीनकोसोबत भागीदारी केली आहे. आता ताे गुरुवापासून ट्रेंट ब्रिज येथे झिम्बाब्वेविरुद्ध सुरु हाेणार्या एकमेव कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे.