स्पोर्ट्स

INDvsSL 2ND ODI : भारताचा श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : INDvsSL 2ND ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताच्या भेदक मा-यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांचा टीकाव लागला नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 39.4 षटकात 215 धावांत गारद झाला. भारताला विजयासाठी 216 धावा करायच्या आहेत.

भारताची  फलंदाजी

राहुलने ठोकले अर्धशतक

फलंदाज केएल राहुलने ९३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील 12 वे अर्धशतक आहे. राहुलने 41व्या षटकात रजिताच्या पहिल्या चेंडूवर एकेरी घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.

भारताला सहावा धक्का

अक्षर पटेलच्या रूपाने भारताला सहावा धक्का बसला. 40व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. धनंजया डी सिल्वाच्या गोलंदाजीवर चमिका करुणारत्नेने त्याला झेलबाद केले. अक्षरने केएल राहुलसोबत सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्याने 21 चेंडूत 21 धावा केल्या. भारताने 40 षटकात 6 बाद 191 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी 60 चेंडूत 25 धावांची गरज आहे.

भारताला पाचवा धक्का

चमिका करुणारत्नेने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने केएल राहुल आणि हार्दिक पंड्याची धोकादायक जोडी फोडली. हार्दिक आणि राहुल यांनी 119 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. हार्दिक 53 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. हार्दिकचा झेल यष्टिरक्षक कुशल मेंडिसने घेतला.

राहुल – हार्दिकची अर्धशतकी भागीदारी

केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. भारताने 29 षटकात 4 विकेट गमावत 141 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी 126 चेंडूत 75 धावा करायच्या आहेत. राहुल 63 चेंडूत 37 तर हार्दिक 36 चेंडूत 23 धावा करून नाबाद आहे. दोघांनी 88 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली आहे.

श्रेयस अय्यर मोठी खेळी करण्यात अपयशी

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. १५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसून राजिताने त्याला एलबीडब्ल्यू केले. अय्यरने रिव्ह्यू घेतला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याने 33 चेंडूत 28 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार निघाले. अय्यरने चांगली सुरुवात केली पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. त्यांनतर हार्दिक पांड्या फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. दुसऱ्या बाजूने के.एल. राहुल फलंदाजी करत आहे.

भारताला विराट धक्का

लाहिरू कुमाराने भारताला तिसरा धक्का दिला. गेल्या सामन्यांत शतक करणाऱ्या विराट कोहलीला त्याने बाद केले. नऊ चेंडूत चार धावा केल्यानंतर कोहली क्लीन बोल्ड झाला. 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुमाराने विराटला बाद केले. यानंतर के.एल. राहुल फलंदाजी करण्य़ासाठी मैदानात आला. भारताने 10 षटकात 3 विकेट गमावत 67 धावा केल्या आहेत.

शुभमन गिल मोठी खेळी करण्यात अपयशी

रोहित शर्मानंतर दुसरा सलामीवीर शुभमन गिलही बाद झाला. गिल 12 चेंडूत 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. गिलला लाहिरू कुमाराने अविष्का फर्नांडोच्या हाती झेलबाद केले. यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी क्रीजवर आला.

भारताला पहिला धक्का

चमिका करुणारत्नेने भारताला पहिला धक्का दिला. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रोहित शर्माला बाद केले. रोहित १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. करुणारत्नेच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक कुशल मेंडिसकरवी झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. भारताने पाच षटकांत एका विकेटवर 33 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेने दिलेल्या आव्हनाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाची सलामीवीर जोडी मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला विजयासाठी 216 धावा करायच्या आहेत. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल मैदाना वर उतरले आहेत आहेत.

तत्पूर्वी,

टीम इंडियाने पाहुण्या संघाला 39.4 ओव्हरमध्ये 215 रन्सवर ऑलआऊट केले. मोहम्मद सिराजने 40व्या षटकात दोन विकेट घेत लंकेचा संघ गुंडाळला. त्याने लाहिरू कुमाराला क्लीन बोल्ड केले. कुमाराला दोन चेंडूंवर खातेही उघडता आले नाही. या सामन्यात सिराजने तीन विकेट घेतल्या. त्याने 5.4 षटकात 30 धावा दिल्या. सिराजशिवाय कुलदीप यादवही यशस्वी ठरला. कुलदीपने 10 षटकात 51 धावा देत तीन बळी घेतले.

श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय कुशल मेंडिसने 34 आणि दुनिथ वेलल्गेने 32 धावा केल्या. वनिंदू हसरंगाने 21 आणि अविष्का फर्नांडोने 20 धावांचे योगदान दिले. कसून राजिता 17 धावा करून नाबाद राहिला. चमिका करुणारत्नेने 17 आणि चरित अस्लंकाने 15 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार दासुन शनाका या सामन्यात अपयशी ठरला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. धनंजय डी सिल्वाला खातेही उघडता आले नाही.

भारताकडून कुलदीप आणि सिराजच्या प्रत्येकी तीन बळींशिवाय उमरान मलिकने दोन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. गुवाहाटीतील पहिली वनडे जिंकून भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवण्याकडे त्यांचे लक्ष असेल.

SCROLL FOR NEXT