Sree Charani ICC Ranking Record pudhari
स्पोर्ट्स

Sree Charani ICC Ranking Record: तब्बल ८१७! ऑस्ट्रलिया, इंग्लंडच्या मुलींनाही जमलं नाही ते भारताच्या श्री चरणीने करून दाखवलं

श्री चरणी ही टी २० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवणारी गोलंदाज ठरली आहे.

Anirudha Sankpal

Sree Charani ICC ranking record: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सील अर्थात आयसीसीने मंगळवारी महिला क्रिकेटपटूंचे ताजे रँकिंग जाहीर केले. भारताच्या श्री चरणीने महिला आंतरराष्ट्रीय टी २० बॉलिंग रँकिंगमध्ये मोठा इतिहास रचला आहे. श्री चरणीने बॉलिंग रँकिंगमध्ये ८१७ रेटिंग मिळवलं आहे. विशेष म्हणजे श्री चरणी ही टी २० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवणारी गोलंदाज ठरली आहे.

श्री चरणीने आठ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडले

भारताच्या २२ वर्षाची फिरकीपटू चरणीने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुट्टचा ८ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे. मेगनने २०१८ मध्ये टी २० रँकिंगमध्ये ८०६ रेटिंग मिळवलं आहे. चरणीने नुकतेच भारताला आठव्यांदा आशिया कप उंचावण्यात मोलाचे योगदान दिले. तिने श्रीलंकेविरूद्धच्या फायनलमध्ये २० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच एशियन्स गेममध्ये सुवर्ण पदक जिंकून देण्यातही सिंहाचा वाटा उचलला. तिने जपानविरूद्ध १० धावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.

दिप्ती दुसऱ्या स्थानावर

दिप्ती शर्माने श्रीलंकेविरूद्धच्या फायनल सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. ती टी २० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तिचे ७५४ पॉईंट्स झाले आहेत. तर इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन (७२३) तिसऱ्या स्थानावर आहे.

स्मृती मानधना देखील टॉप ५ मध्ये

टी २० महिला फलंदाज रँकिंगमध्ये स्मृती मानधाना ही टॉप ५ मध्ये पोहचली आहे. तिने ७५४ रेटिंगसह पाचवे स्थान पटकवले. डावखुऱ्या स्मृतीने गोल्ड मेडलच्या सामन्यात ४५ चेंडू ७९ धावांची खेळी केली होती. यात पाच चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.

शफालीचे रँकिंग कायम

तिची सलामीची पार्टनर शफाली वर्मा टी २० रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तिने फायनलमध्ये २९ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले होते. ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मूनी (७८५) टी २० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचीच जॉर्जिया वोल ७७९ अंकांसह दुसऱ्या आणि दक्षिण अफ्रिकेची लॉरा बोल्वार्ड्ट ७६६ अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT