Australia vs South Africa World Test Championship final
लंडन : गेल्या २७ वर्षांपासून आफ्रिकेच्या कपाळावर लागलेला 'चोकर्स'चा शिक्का पुसून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट फायनलचा किताब जिंकला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने पहिले आयसीसी जेतेपद जिंकले.
लॉर्ड्स मैदानावर रंगलेल्या या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले होते. एडेन मार्करामच्या शतक आणि टेम्बा बावुमाच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी तिसऱ्या दिवशी दोन विकेट गमावून २१३ धावा केल्या होत्या.
तिसऱ्या दिवसअखेर ५६ षटकात २ बाद २१३ धावांपर्यंत आश्वासक मजल मारल्याने संघाला विजयासाठी फक्त ६९ धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या दिवशी मार्कराम व बवूमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी १४३ धावांची अभेद्य भागीदारी साकारली होती. विजयासाठी २८२ धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी केवळ दोन गडी गमावत विजयी लक्ष पार करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या लढतीत द. आफ्रिकेने पहिल्यावहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा शतकवीर एडन मार्कराम १०२, तर कर्णधार बवूमा ६५ धावांवर खेळायला सुरूवात केली. पण पॅट कमिन्सने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याला बाद करत आफ्रिकेला धक्का दिला. बावुमाने १३४ चेंडूत ५ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. त्यानंतर स्टब्ज ट्रिस्टन स्टब्ज याला मिचेल स्टार्कने अवघ्या ८ धावांवर त्रिफळाचित केले.
विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना सलामीवर शतकवीर एडेन मार्कराम १३६ धावा काढून बाद झाला. त्याने २०७ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार ठोकले. जोश हेझलवूडने त्याला ट्रेव्हिस हेडकरवी झेलबाद केले.
डेव्हिड बेडिंगहम (नाबाद २१ ) आणि काईल वेरियन (नाबाद 7) यांनी आफ्रिकेची अधिक पडझड होऊ न देता संघाची विजेतेपदाची नौका पार लावली. वेरियन याने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर चौकार ठोकत या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव - सर्वबाद २१२, दुसरा डाव सर्वबाद २०७
दक्षिण आफ्रिका पहिला डाव स्कोअर - सर्वबाद १३८, षटके ५७.१, अवांतर : १२
द. आफ्रिका दुसरा डाव (टार्गेट २८२) स्कोअर २१३/२, षटके ५६, अवांतर : १३
द. आफ्रिका दुसरा डाव (दिवस चौथा) ५ बाद २८२, षटके ८३.४
१० व्या गड्यासाठी केलेली ५९ धावांची भागीदारी ऐतिहासिक ठरली. या जोडीने आयसीसीच्या कोणत्याही फायनलमध्ये शेवटच्या गड्यासाठी १९७५ वन-डे वर्ल्डकप फायनलमध्ये डेनिस लिली-जेफ थॉमसन यांचा ४१ धावांचा विक्रम मोडीत काढला.