Sourav Ganguly Delhi Capitals Pudhari
स्पोर्ट्स

Sourav Ganguly Delhi Capitals: दादा पुन्हा मैदानात उतरले! सौरव गांगुली बनले दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक; फ्रँचायझीची मोठी घोषणा

Sourav Ganguly Delhi Capitals: सौरव गांगुली यांची दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Rahul Shelke

Sourav Ganguly Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने मोठी घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सौरव गांगुली यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी (6 ऑक्टोबर) याबाबत अधिकृत घोषणा केली.

यापूर्वी हेमंग बदानी दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांच्या जागी सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गांगुली यांच्याकडे भारतीय क्रिकेटचा मोठा अनुभव असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती.

सौरव गांगुली यांचा दिल्ली कॅपिटल्ससोबतचा संबंध यापूर्वीपासूनच आहे. 2019 मध्ये ते दिल्ली कॅपिटल्ससोबत सल्लागार म्हणून जोडले गेले होते. त्यानंतर त्यांनी संघाचे ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणूनही काम पाहिले. त्यामुळे दिल्लीच्या संघाची रचना आणि कार्यपद्धतीची त्यांना चांगली माहिती आहे.

आता पुन्हा एकदा गांगुली यांच्याकडे संघाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि क्रिकेटच्या ज्ञानाचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला आगामी IPL हंगामात होण्याची अपेक्षा आहे.

मुख्य प्रशिक्षक म्हणून गांगुली यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सला मजबूत संघ तयार करण्याचे आणि आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे आव्हान असेल. त्यांच्या नियुक्तीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT