Smriti - Palash Marriage:
टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचे लग्न थाटामाटात २३ नोव्हेंबर रोजी होणार होतं. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळं हे लग्न पुढं ढकलण्यात आलं. त्यांना त्याच दिवशी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी त्यांची प्रकृती ठीक झाल्यावर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
स्मृतीचं लग्न अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळं याबाबत अनेक थेअरीज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक दावे अन् चॅट व्हायरल केले जात आहेत. त्यातच स्मृती मानधनाने आपल्या लग्नासंबंधीच्या सर्व पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्याने वेगळ्याच चर्चेला ऊत आला. आता स्मृती आणि पलाश यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईल पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.
दरम्यान, स्मृती आणि पलाशनं आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर एक बदल करत इमोजी अॅड केली आहे. दोघांनीही एकसारखीच इमोजी अॅड केल्यामुळं आता पुन्हा चर्चेला ऊत आला आहे. स्मृतीनं आपल्या बायोमध्ये निळ्या रंगाचा इमोजी लावला आहे. याच प्रकारचा इमोजी पलाशनं देखील आपल्या बायोमध्ये लावला आहे.
या इमोजीचा अधिकृत अर्थ काय होतो हे मात्र स्पष्ट नाही. मात्र अनेक लोकं या इमोजीचा किंवा या प्रकारच्या ब्रेसलेट किंवा लॉकेटचा वापर हा वाईट नजर लागू नये म्हणून करतात.
स्मृतीचं लग्न का पुढे ढकलण्यात आलं त्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या थेअरीज सुरू असतात. सध्या तरी अधिकृतरित्या स्मृतीचे वडील श्रीनिवास मांधना यांची प्रकृती बिघडल्यामुळं हे लग्न पुढं ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता स्मृती आणि पलाश यांनी जो इमोजी आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये वापरला आहे त्यावरून नेटकरी अजून वेगवेगळ्या थेअरीज् मांडत आहेत.