लंडन : इटालियन जागतिक अव्वल मानांकित जान्निक सिन्नरने कार्लोस अल्काराझला 4-6,6-4,6-4,6-4 अशी धूळ चारत विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले. File Photo
स्पोर्ट्स

Wimbledon Final 2025 : विम्बल्डनचा नवा 'किंग'! जॅनिक सिन्नर ने अल्काराझला नमवत कोरले पहिले विजेतेपद

सिन्नरने विम्बल्डन स्पर्धेतील आपले पहिले विजेतेपद पटकावले

अरुण पाटील

लंडन : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिन्नरने विम्बल्डन पुरुष एकेरी स्पर्धा जिंकली आहे. या ऐतिहासिक आणि थरारक अंतिम सामन्यात गतविजेत्या कार्लोस अल्काराझचा दिमाखदार पराभव केला. सेंटर कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराजचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव करून टेनिसच्या मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

सामन्याच्या सुरुवातीला अल्काराझने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आपल्या आक्रमक खेळाने पहिला सेट 6-4 असा जिंकून सिन्नरवर दबाव आणला. असे वाटत होते की अल्काराझ सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन ट्रॉफी उंचावणार, पण सिन्नरचे इरादे काही वेगळेच होते.

पहिला सेट गमावल्यानंतर 24 वर्षीय सिन्नरने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने आपल्या खेळात कमालीचा संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर मिलाफ साधला. आपल्या अचूक सर्व्हिस आणि शक्तिशाली बेसलाइन फटक्यांच्या जोरावर त्याने अल्काराझला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली, पण महत्त्वाच्या क्षणी सिन्नरने आपले नशीब आणि खेळ दोन्ही उंचावत दोन्ही सेट 6-4, 6-4 असे जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

चौथ्या सेटमध्ये सिन्नरचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. त्याने अल्काराझला कोणतीही संधी न देता सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. अखेर, एक दमदार सर्व्हिस करत त्याने चॅम्पियनशिप पॉईंट जिंकला आणि टेनिसच्या या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजयानंतर सिन्नरने कोर्टवरच गुडघे टेकून आनंद साजरा केला.

हे सिन्नरचे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद असून, या विजयाने त्याने जागतिक क्रमवारीत आपले अव्वल स्थान अधिकच भक्कम केले आहे. सिन्नर आणि अल्काराझ यांच्यातील ही लढत टेनिसमधील नव्या पिढीच्या शानदार प्रतिस्पर्धेची ग्वाही देणारी ठरली. टेनिसच्या हिरवळीवरील या नव्या बादशाहच्या रूपाने, सिन्नरने केवळ एक स्पर्धा जिंकली नाही, तर भविष्यातील अनेक रोमांचक सामन्यांची आणि एका शानदार कारकिर्दीची आशा निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT