पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा हिने पराभवासाठी कुटुंबाला जबाबदार ठरविणार्‍यांना सडेताेड प्रत्‍युत्तर दिले आहे. (Image source- X)
स्पोर्ट्स

"त्‍यांचे विचार हास्यास्पद नव्‍हे लाजिरवाणे": 'PBKS'च्या पराभवानंतर श्रेयसची बहिण का संतापली?

IPL 2025 : पराभवासाठी कुटुंबीयांना जबाबदार धरणार्‍यांना दिले सडेतोड प्रत्‍युत्तर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्‍ये पंजाब किंग्जला घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. २० एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांना ७ गडी राखून पराभूत केले. हा सामना पाहण्यासाठी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याची बहीण श्रेष्ठा ( Shrestha Iyer) देखील मैदानावर होती. मात्र या सामन्‍यानंतर पराभवासाठी खेळाडूंच्‍या कुटुंबाला जबाबदार धरणाऱ्यांवर कृतीवर श्रेष्‍ठा संतापली. तिने ट्रोल करणार्‍या सोशल मीडियावर सडेतोड प्रत्‍युत्तरही दिले. ( IPL 2025 PBKS vs RCB)

श्रेष्‍ठा अय्यर का संतापली ?

श्रेयस अय्यरच्या बहिणीने इन्स्टा स्टोरीद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पराभवासाठी खेळाडूंच्या कुटुंबियांवर बोट दाखवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान श्रेष्ठा पंजाब किंग्ज संघाचे समर्थन करताना दिसली; सामन्यानंतर तिने पोस्‍ट केलेल्‍या इन्स्टा स्टोरीमध्‍ये तिने ट्रोलर्सच्या कमेंट्सचा समाचार घेतला.

श्रेष्ठा नेमकं काय म्हणाली?

श्रेष्ठा अय्यर यांनी इंस्टा स्टोरीमध्‍ये लिहिले आहे की, "जे क्रिकेट सामन्‍यातील पराभवासाठी खेळाडूच्‍या कुटुंबाला जबाबदार धरतात, प्रामाणिकपणे सांगायचे तर ते खूपच दुःखद आहे. आपण प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित नसलो तरी संघाला आपला पाठिंबा नेहमीच राहणार आहे. काही लोकांनी पराभवासाठी मला दोष दिला. त्‍याचे विचार केवळ हास्यास्पदच नाहीत तर लाजिरवाणे आहेत. सामना टीम इंडियाचा असो की आयपीएलमधील मी यापूर्वीही अनेक सामन्यांसाठी मैदानावर उपस्‍थित राहिले आहे. त्यापैकी बहुतेक सामने आम्ही जिंकले आहेत; पण मला वाटतं की त्या गोष्टी जाणून घेण्याऐवजी मला ट्रोल करण्यासाठी वेळच नाहीये.

मला नेहमीच माझ्‍या भावाच्‍या टीमची समर्थक

मी नेहमीच माझ्या भावाचा आणि त्याच्या टीमची समर्थक राहिली आहे. त्‍यामुळे मला ट्रोल करताना वापरण्‍यात आलेल्‍या बेताल विधानांचा माझ्‍यावर परिणाम हेणार नाही. २० एप्रिलचा दिवस पंजाब किंग्जसाठी नव्हता. विजय आणि पराभव हा खेळाचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाइन ट्रोलिंग करण्याव्यतिरिक्त काहीतरी करण्याचा किंवा जाणून घेण्याचा विचार कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील. पुढच्या वेळी असे काही करण्यापूर्वी, दोनदा विचार करा, असा इशाराही श्रेष्‍ठाने दिला आहे.

आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला

२० एप्रिल रोजी घरच्‍या मैदानावर झालेल्‍या सामन्‍यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने आरसीबीसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीने १८.५ षटकांत ३ गडी गमावत सहज हे लक्ष्‍य साध्‍य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT