स्पोर्ट्स

श्रेयस अय्यर झाला फिट, कर्णधार कोण? पंत की …

Pudhari News

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आपल्या खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे. आता तो आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामात खेळण्यासाठी उत्सुक आहे. हा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. 

मेस्सी बनला 'फ्री किक'चा बादशाह

श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या अय्यरला आयपीएलला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थिती संघाची धुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली होती. 

दरम्यान, फिट झालेला अय्यर म्हणाला, 'माझा खांदा आता बरा झाला आहे. आता फक्त तादक परत मिळवायची आहे. यासाठी एक महिना लागेल. सराव देखील सुरु आहे. मला असे वाटते की मी उर्वरित आयपीएल हंगाम खेळू शकतो.' ही प्रतिक्रिया त्याने एका पॉडकास्टदरम्यान दिली. 

याच दरम्यान त्याला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार पुन्हा तुझ्याकडेच येणार का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'मला कर्णधारपदाबाबत काही माहीत नाही. हे संघ मालकांच्या हातात आहे. पण, संघाने पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. आम्ही अव्वल स्थानावर आहेत. हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. माझा मुख्य उद्येश आणि उद्दिष्ट हे दिल्ली ने कधीही आयपीएलची ट्रॉफी उंचावलेली नाही. ती उंचावायची आहे.'

स्मृतीचा 'हा' व्हिडीओ पाहून म्हणाल… जबरदस्त

श्रेयस अय्यरने दिल्लीचे आयपीएल २०२० मध्ये नेतृत्व केले होते. त्यावेळी दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली होती.पण, मुंबई इंडियन्सने त्यांचा अंतिम सामन्यात पराभव करत पहिल्या वहिल्या विजेतेपदापासून त्यांना वंचित ठेवले होते. 

यंदाच्या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पण, कोरोनामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता हा उर्वरित १४ वा आयपीएल हंगाम युएईमध्ये सप्टेंबर १९ ते ऑक्टोबर १५ दरम्यान खेळवण्यात येणार आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT