Shreyanka Patil
श्रेयंका पाटील स्पर्धेतून बाहेर file photo
स्पोर्ट्स

Shreyanka Patil | भारतीय संघाला मोठा धक्का! श्रेयंका पाटील आशिया कपमधून बाहेर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील (Shreyamka Patil) बोटाला दुखापत झाल्याने महिला आशिया कपमधून (Womens Asia Cup) बाहेर पडली आहे. १९ जुलै रोजी झालेल्या पाकिस्तान विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात तिला दुखापत झाली. आशियाई क्रिकेट कौन्सिलने (ACC) याबाबतची माहिती दिली आहे.

दीप्ती-रेणुका-पूजाचे एकत्रित ७ बळी व शफाली-स्मृती यांच्या ८५ धावांच्या भरभक्कम सलामीच्या बळावर विद्यमान विजेत्या भारताने आशिया चषक महिला स्पर्धेतील (Womens Asia Cup) सलामी लढतीत कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला आणि आपल्या मोहिमेचा जोरदार शुभारंभ केला. दीप्ती-रेणुका- पूजाच्या त्रिकुटासमोर पाकिस्तानची दाणादाण उडाली व त्यांना १९.२ षटकांत सर्वबाद १०८ धावांवर समाधान मानावे लागले, तर प्रत्युत्तरात भारताने १४.१ पटकांत ३ बाद १०९ धावांसह दणकेबाज विजय संपादन केला. पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करताना झेल घेण्याच्या प्रयत्नात श्रेयंकाच्या (Shreyamka Patil) डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. आरसीबीकडून खेळतानाही श्रेयंकाला त्याच हाताला दुखापत झाली होती. ज्यामुळे तिला महिला प्रीमियर लीग (WPL 2024) मधील काही सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. दुखापतीमुळे आता या स्पर्धेतूनही बाहेर राहावे लागत आहे.

SCROLL FOR NEXT