स्पोर्ट्स

सौरभ चौधरी, मनू भाकर यांना ‘सुवर्ण’

Pudhari News

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सौरभ चौधरी आणि मनू भाकर जोडीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत जोरदार कामगिरी कायम ठेवत सुवर्ण कामगिरी केली. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात इराणच्या गोलनोश सेबहातोलाही आणि जावेद फोरोगीला 16-12 अशा फरकाने पराभूत केले. दुसर्‍या सीरिजनंतर 18 वर्षीय चौधरी आणि 19 वर्षीय भाकर 0-4 असे पिछाडीवर होते; पण त्यांनी जोरदार पुनरागमन केले. भारताचे या स्पर्धेतील हे पाचवे सुवर्णपदक आहे आणि ते अव्वल स्थानी आहेत.

या जोडीचे विश्वचषक मिश्र सांघिक स्पर्धेत हे पाचवे सुवर्णपदक आहे. इराणी संघाने चांगली सुरुवात केली; पण भारतीय नेमबाजांनी सुरुवातीचा अडथळा पार केला आणि नंतर मागे वळून पाहिले नाही व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारताच्या यशस्विनी सिंह देसवाल आणि अभिषेक वर्माने तुर्कीच्या सेवाल इलाइदा तारहान व इस्माईल केलेसला 17-13 असे पराभूत करत कांस्यपदक जिंकले. 

इलावेनिल वलारिवान, दिव्यांश सिंह पनवार यांची सुवर्ण कामगिरी

भारताच्या दिव्यांश सिंह पनवार व इलावेनिल वलारिवान यांनी 10 मीटर एअर रायफलमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत  सुवर्णपदक मिळवले. भारतीय जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत 16 गुणांची कमाई करत हंगेरीच्या अव्वल मानांकित इस्तावान पेनी आणि इस्जतर डेनेसला मागे टाकले. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT