शिखर धवनची निवृत्ती, रोहीत शर्माने केली भावूक पोस्ट  Rohit Sharama X Post
स्पोर्ट्स

शिखर धवनच्‍या निवृत्तीवर भावूक पोस्ट शेअर करत रोहित शर्मा म्‍हणाला...

Rohit Sharma-Shikhar Dhawan | अनेक आठवणी फोटो स्वरूपात केल्‍या शेअर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याने शनिवारी (दि. २४ ऑगस्‍ट ) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्‍याच्‍या यानंतर भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. अनेक वर्षांपासून धवनसोबत मॅच ओपनिंग करणाऱ्या रोहितने एका पोस्टद्वारे त्याच्यासोबतच्या अनेक आठवणी फोटो स्वरूपात शेअर केल्या आहेत.

'द अल्टीमेट जट...' 

रोहित शर्माने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये धवनला त्याच्या क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी 'द अल्टीमेट जट' असा उल्लेख केला आहे. रोहितने पुढे धवनसोबत त्याने भारतीय संघात अशा अनेक आठवणी निर्माण केल्या ज्या तो आयुष्यभर लक्षात ठेवेल, असे देखील म्हटले आहे. शिखर आणि राेहित जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१४८ धावा केल्या आहेत. सर्व सलामीच्या जोडींमध्ये त्‍यांची जाेडी चौथ्या क्रमांकावरची आहे

शिखर-रोहित जोडीची अनेक सामन्यात शानदार सलामी

रोहितने इंस्टाग्रामवर धवनबद्दल लिहिले की, 'रुम्स शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंतच्या दुसऱ्या टोकाला तू माझे काम नेहमीच सोपे केले आहेस. द अल्टिमेट जट.

शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी अनेक वर्षांपासून भारताला शानदार सलामी दिली आणि देशात क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. या जोडीला एकदिवसीय सामन्यातील सर्वात यशस्वी सलामीच्या जोडीपैकी एक म्हणून ओळखले जाते.

दोघांच्या जोडीने सरासरी 5148 धावा केल्या

रोहित आणि धवन या जोडीने 115 एकदिवसीय डावात 44 पेक्षा जास्त सरासरीने 5148 धावा जोडल्या आहेत.2013 च्या चॅम्पियन्समध्येही या दोघांनी शानदार सलामी देत ​​भारताला चॅम्पियन बनवले होते. याशिवाय या दोघांनी 2015 एकदिवसीय विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 एकदिवसीय विश्वचषकातील अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाच्‍या डावाला चांगली सुरुवात करून दिली हाेती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT