भारत - बांगलादेश सामन्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपट्टू शिखर धवन एका तरुणीसोबत दिसून आला.  X Account
स्पोर्ट्स

'गब्बर'सोबतची 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Shikhar Dhawan Girlfriend | भारत - बांगलादेश सामन्यादरम्यान एकत्र स्पॉट

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी क्रिकेटपट्टू आणि क्रिकेट विश्वात गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो रील्स आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी सतत कनेक्ट असतो. दरम्यान, गुरुवारी, भारत बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) खेळलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यावेळी तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्टँडवर एकत्रित बसलेला दिसून आला. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) एक तरुणी दिसून आली. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून सामना एन्जॉय करत होते. ती मुलगी कोण आहे? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेले नाही. पण त्यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या काही व्हिडिओंवरून धवनसोबत असलेल्या तरुणीचे नाव सोफी शाइन असे आहे. ती आयर्लंडची असून एक उत्पादन सल्लागार आहे. धवन आणि तिची मैत्री आहे. परंतु, त्यांच्या नात्याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही.

२०२३ मध्ये घटस्फोट झाला

शिखर धवन आणि त्यांची पत्नी आयेशा यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये घटस्फोट झाला आहे. तथापि, दोघेही २०२० पासून वेगळे राहत होते. घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा जोरावरही आयशासोबत ऑस्ट्रेलियाला गेला. आयशापासून घटस्फोट घेतल्यानंतर धवनचे अनेक महिलांशी संबंध जोडले गेले होते. पण त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नव्हते.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यासाठी धवन दुबईमध्ये दाखल झाला होता. तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. धवनने ट्रॉफीसोबत फोटो सेशन केले. त्यानंतर तो काही काळ कॉमेंट्रीसाठीही आला होता. तिथे त्याने आणि इतर भारतीय मित्रांसोबत गप्पा मारल्या.

दरम्यान, धवनसोबत एक सुंदर महिलाही तिथे उपस्थित होती. आणि त्या दोघांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धवन या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

२०२४ मध्ये क्रिकेटला निरोप दिला

शिखर धवनने २४ ऑगस्ट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण २६९ सामने खेळले आहेत. ज्यात ३४ कसोटी, १३७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने आहेत. शिखरने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १०,८६७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ५५ अर्धशतके आणि २४ शतकी खेळ्या खेळल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT