Shashi Tharoor On Ranji
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी फलंदाज सरफराज खान याला इंडिया अ संघातून वगळल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार म्हणजे निवड प्रक्रियेत स्थानिक क्रिकेटला कसे कमी लेखले जाते याचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता भारतीय क्रिकेट संघ निवडीच्या धोरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
एक्स पोस्टमध्ये थरूर यांनी नमूद केले आहे की, “हे स्पष्टपणे संतापजनक आहे. @SarfarazA_54 ने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरासरी 65 पेक्षा जास्त धावा केल्या, कसोटी पदार्पणात अर्धशतक आणि आपण गमावलेल्या कसोटीत 150 धावा त्याने केल्या आहेत. इंग्लंडमधील त्याच्या एकमेव दौऱ्याच्या सामन्यात 92 धावा केल्या (आणि संपूर्ण भारतीय कसोटी संघाविरुद्ध सराव सामन्यात शतक) - आणि तरीही तो निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
आपल्या पोस्टमध्ये थरुर यांनी देशातील अनुभवी क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा उल्लेख करत निवडकर्ते राबवत असलेल्या प्रक्रियेवरच सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "#RanjiTrophy मध्ये @ajinkyarahane88, @PrithviShaw आणि @karun126 धावा काढत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. आमचे निवडकर्ते 'क्षमतेवर' टीका करण्यासाठी सिद्ध प्रतिभेला वगळत आहेत. फक्त #IPL मध्येच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचे मूल्यमापन केले पाहिजे; अन्यथा कोणी रणजी खेळण्याची तसदी का घ्यावी?" , असा सवालही त्यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) केला आहे. तसेच अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या दृष्टिकोनावर चर्चा सूरु असताना थरूर यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अलीकडेच बंगालसाठी पाच बळी घेतले होते. मात्र त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी १५९ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेने वयानुसार निवड" असे स्पष्ट करत दृढ निश्चिय आणि अनुभव हे तरुणांइतकेच महत्त्वाचे असले पाहिजेत, असे म्हणत निवड समितीवर अप्रत्यक्ष नाराजीव्य क्त केली. गेल्या दोन रणजी हंगामात १५०० पेक्षा जास्त धावा करूनही दुर्लक्षित केल्याबद्दल करुण नायरनेही आपली निराशा व्यक्त केली, तर शार्दुल ठाकूरने मर्यादित अष्टपैलू खेळाडूंसाठी तीव्र स्पर्धेचे संकेत दिले होते. आता थरुर यांनीही भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीवर भाष्य करत या चर्चेला नवे वळण दिले आहे.