शरद पवारांमुळेच आयपीएल; ललित मोदींनी दिलं प्रत्युत्तर file photo
स्पोर्ट्स

शरद पवारांमुळेच आयपीएल; ललित मोदींनी नेटकऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

Lalit Modi : वानखेडेवर स्टँडला शरद पवारांच्या नावावरून सोशल मीडियावर टीका

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवार यांना हा सन्मान देण्यात आला. एमसीएच्या एक्स हँडलवर या नावाच्या घोषणेसंदर्भात एक पोस्ट करण्यात आली. मात्र, या पोस्टवर काही नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. टीकांनंतर आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी या वादाला उत्तर देताना शरद पवारांचे आभार मानले आहेत.

शरद पवारांनी पाठिंबा दिल्यामुळेच आयपीएल

ललित मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, आयपीएलसाठी पवारांचे आभार माना. शरद पवार यांच्या माझ्यावरील आंधळ्या विश्वासामुळे आणि शंभर टक्के पाठिंबा दिल्यामुळेच आयपीएल झाले. आपण सर्वजण ज्या जागतिक आयकॉनवर प्रेम करतो त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी माझे स्वप्न साकार केले आणि आज आयपीएलशिवाय जग जगू शकत नाही. म्हणून पवार यांचे व्हिजन कधीही विसरू नका. मी त्यांना सलाम करतो, असे ललित मोदी यांनी म्हटले आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून पवार यांनी २००८ मध्ये ललित मोदींना या लीगची सुरुवात करण्यासाठी पाठिंबा दिला होता.

वानखेडेवर ​​रोहित शर्माच्या नावाचेही स्टँड

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी (दि. १५) एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वानखेडे स्टेडियमवरील आणखी एका स्टँडला भारतीय कर्णधार रोहित शर्माचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर माजी फलंदाज अजित वाडेकर यांचेही नाव दिले जाणार आहे. दरम्यान, याआधी वानखेडे स्टेडियमवरील स्टँडना सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासह अनेक क्रिकेटमधील दिग्गजांची नावे देण्यात आली आहेत.

वानखेडे स्टेडियमवरील स्टँडची नावे

ग्रँड स्टँड लेव्हल ३ : श्री शरद पवार स्टँड

ग्रँड स्टँड लेव्हल ४: अजित वाडेकर स्टँड

दिवेचा पॅव्हेलियन लेव्हल ३ : रोहित शर्मा स्टँड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT