Sara Shubman viral videoShubman Gill latest news
नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने नुकतेच लंडनमध्ये त्याच्या 'यूवीकॅन फाउंडेशन' या संस्थेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय कसोटी संघ आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर हे देखील आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत हे सारा तेंडुलकरच्या नावावरून शुभमन गिलला चिडवत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर जवळच बसलेले होते. त्यांच्यासोबत भारतीय कसोटी संघाचे खेळाडूही बसलेले दिसतात. व्हिडिओमध्ये जडेजा आणि पंत हे शुभमन गिलची मस्करी करताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच ठिकाणी सचिनची पत्नी अंजली आणि मुलगी सारा या देखील बसलेल्या दिसतात. या मजेत केएल राहुलही सामील होऊन हसताना दिसत आहे.
युवराज सिंगच्या चॅरिटी कार्यक्रमात गिल आणि सारा एकत्र दिसले होते. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे, कारण गेल्या बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप दोघांकडूनही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी, शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या एका फोटोची इंटरनेटवर चर्चा सुरू होती, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या. परंतु नंतर अर्जुन आणि सारा तेंडुलकरचा फोटो एडिट केल्याचे समोर आले.