RCB vs GT | आयपीएलमध्ये ख्रिस गेलपेक्षाही वेगवान ठरला 'हा' भारतीय खेळाडू File Photo
स्पोर्ट्स

RCB vs GT | आयपीएलमध्ये ख्रिस गेलपेक्षाही वेगवान ठरला 'हा' भारतीय खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा करणारा खेळाडू

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर; वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सचा (जीटी) सलामीवीर साई सुदर्शनने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम आता सुदर्शनच्या नावावर जमा झाला असून त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे.

साई सुदर्शनने अवघ्या 47 डावांत हा टप्पा गाठला. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने 48 डावांत 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. आरसीबी विरुद्धच्या या सामन्यापूर्वी सुदर्शनला 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 72 धावांची गरज होती. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कृणाल पंड्याला षटकार ठोकत त्याने हा विक्रम केला. सुदर्शनने 58 चेंडूंत 100 धावांची खेळी करत आयपीएल 2026 मधील आपले पहिले शतकही झळकावले. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

साईची आयपीएल कारकीर्द : आता सुदर्शनच्या नावावर 47 डावांत 47.16 च्या सरासरीने 2028 धावा आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 146.96 इतका प्रभावी आहे. चालू हंगामातही त्याने 7 डावांत 155.63 च्या स्ट्राईक रेटने 235 धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT