स्पोर्ट्स

VIDEO : ‘त्यांची गाडी बघून आम्ही आमची गाडी थांबवली...’ : गावातील पोरांच्या दोनचाकी ‘कार’च्या जुगाडवर सचिन तेंडुलकर फिदा

Sachin Tendulkar X post Viral : सचिनने शेअर केला कल्पक 'कार'चा व्हिडिओ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर केवळ मैदानातील विक्रमांसाठीच नाही, तर आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळेही सतत चर्चेत असतो. नुकताच सचिनने भारताच्या एका दुर्गम भागातील प्रवासादरम्यानचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका व्यक्तीने स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेली अनोखी 'कार' पाहून सचिन भारावून गेला असून, त्याने भारतीय प्रतिभेचे कौतुक केले आहे.

सचिनने त्याच्या अधिकृत X हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ‘‘भारताच्या अनेक दुर्गम कोपऱ्यांपैकी एका भागातून प्रवास करत असताना, आम्ही एका अशा 'कार'पाशी थांबलो जी कोणत्याही शोरूममधून आलेली नाही, तर ती निव्वळ कल्पकतेतून साकारली गेली आहे.’’

सचिन पुढे म्हणतो, ‘‘हे अशा प्रकारचे टॅलेंट आहे जे कोणत्याही परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहत नाही, तर कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढते. बस, फक्त संधी मिळायला हवी (बस मौका मिलना चाहिये)!’’

कल्पकता..!

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गावातील लहान मुलांनी सायकलची दोन चाके, चार काठ्यांच्या सहाय्याने एक छोटी ढक्कल गाडी तयार करून ती चालवताना दिसत आहे. दोन चाकांना जोडणा-या काठीवर एक मुलगा बसला आहे. पुढच्या बाजूला तीन काठ्या एकमेकांना त्रिकोणात जोडून त्याचे टोक एका मुलाचा हातता आहे. तो मुलगा ही गाडी ओढतो. आणि सुसाट पळतो. या गाडीला शोरूममधील महागड्या गाड्यांसारखी चकाकी नसली, तरी या गाडीची कार्यक्षमता पाहून सचिन भारावून गेल्याचे दिसते.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सचिनने हे ट्विट केल्यापासून काही वेळातच हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘‘भारताच्या खेड्यापाड्यात असे कितीतरी कलाकार आणि कल्पक लोक आहेत ज्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही,’’ अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. सचिनने या साध्या पण कल्पक आविष्काराची दखल घेतल्यामुळे त्या अज्ञात कारागिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT