स्पोर्ट्स

सचिनने अमेरिकेत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत केले ट्विट 

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज (दि. 6) अमेरिकेत सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सचिनने दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला आहे. 'खेळामध्ये जग बदलण्याची ताकद आहे', असे हे वक्तव्य आहे. या ट्विटसोबत सचिनने आयसीसीचा एका सुरेख व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंग्लंडने 2019 चा वर्ल्डकप जिंकला होता त्यावेळीचा आहे. आयसीसीने त्याला सध्या सुरु असलेल्या वर्णभेद विरोधी आंदोलनाची सुरखे जोड दिली आहे. 

सचिनने आज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आयसीसीचा वर्णभेद विरोधी व्हिडिओ शेअर करुन त्याला 'नेल्सन मंडेला एकदा म्हणाले होते, 'खेळामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. त्याच्याकडे इतर कशापेक्षाही जगाला एकत्र आणण्याची मोठी ताकद आहे. सत्य आहे हे.' असे कॅप्शन दिले आहे. 

सचिनने आयसीसीचा जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ज्या क्षणी इंग्लंडने 2019 चा वर्ल्डकप जिंकला तो क्षण आहे. त्याचबरोबर या व्हिडिओत 'वैविध्यतेशिवाय क्रिकेट काहीही नाही. वैविध्यतेशिवाय आपल्याला संपूर्ण चित्र दिसत नाही.' असा संदेशही देण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे आससीसीने आपण वर्णद्वेशाविरोधी आहोत हे सांगितले.  

 

या व्हिडिओत जोफ्रा आर्चरने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचा शेवटचा चेंडू टाकला होता त्याचे चित्रण आहे. या चेंडूनंतर इंग्लंडने इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. विशेष म्हणजे सध्याच्या इंग्लंडच्या संघात आफ्रिकन, आशिया न्यूझीलंड असे विविध ठिकाणचे खेळाडू आहेत. त्यामुळे या वैविध्यतेमुळे इंग्लंड संघात संपूर्ण जग सामावले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने आयसीसीला वर्णद्वेश विरोधी आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन केले होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT