मुंबई : पुढारी ऑनलाईन
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आज इन्स्टाग्रामवरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या अचानक निवृत्तीच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण, त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवरुन त्याने या निवृत्तीचे प्लॅनिंग आधीपासूनच केल्याचे जाणवत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याला त्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकरने 'तुझे भारतीय क्रिकेटसाठीचे योगदोन हे अभुतपूर्व आहे एम. एस. धोनी. 2011 चा वर्ल्डकप एकत्र जिंकणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला तुझ्या दुसऱ्या इनिंगला शुभेच्छा.' असे ट्विट केले.
महेंद्र सिंह धोनी बरोबरच धोनीचा जिगरी दोस्त समजला जाणारा सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने धोनीचे आभार मानत आपणही तुझ्या या पुढच्या प्रवासात सहप्रवासी असू अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करून क्रिकेटला राम राम ठोकला. विशेष म्हणजे धोनी आणि रैना सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा सराव करण्यासाठी चेन्नईत दाखल झाले आहेत.