shoaib akhtar mohammad asif drug trafficking: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे माजी अंडर सेक्रेटरी आरव्हीएस मणी यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानी क्रिकेटर आणि त्यांचे डेलिगेशन मेंबर्स शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ जेव्हा केव्हा भारतात येत होते त्यावेळी ते ड्रग्जची एक खेप घेऊन येत होते.
मणी यांनी सांगितलं की पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर येताना ड्रग्ज ट्रॅफिकिंग करत होती. यात ISI चा हात होता. आव्हीएस मणी हे केंद्रीय सचिवालय सेवा अधिकारी होते. त्यांनी २००६ ते २०२० पर्यंत गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात अंडर सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं. आता ते सेवानिवृत्त झाले असून त्यांनी जम्मू काश्मीर, इशान्य भारत आणि दहशतवाद सारख्या संवेदनशील मुद्द्यांवर काम केलं आहे. एएनआयच्या पॉडकास्टमध्ये मणी यांनी हा दावा केला आहे.
भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा कसा रोल आहे हे सांगताना त्यांनी दहशतवादाचे ३० टक्के फंडिंग हे ड्रग्ज ट्रॅफिकिंगमधून येत होते.
मणी म्हणाले की, माझ्या कार्यकाळात भारतात येणारे सर्व पाकिस्तानी डेलिगेशन हे भारतात ड्रग्ज घेऊन येत होतं. ते म्हणाले की, या केसचं रिपोर्टिंग झालं होतं. शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी हाय कमिशनसमोर स्वतः स्विकारलं होतं की ते ड्रग्ज घेऊन आलेत. त्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आलं होतं.'
ते पुढे म्हणाले की, 'ज्या ज्यावेळी पाकिस्तानचे डिलेगेशन, संघ किंवा इतर कोणी भारतात येत होते. त्यावेळी ते ड्रग्ज तस्कारी करत होते. ते वैयक्तिक वापरासाठी घेऊन येत नव्हते. हे १६ ऑक्टोबर रोजी झालं होतं. जवळपास ६ महिन्यांनी मार्चमध्ये पाकिस्तान टीमचे इंग्लिश कोच बॉब वुल्मर ज्यांनी पाकिस्तानी खेळाडूंद्वारे ड्रग्ज ट्रॅफिकिंग करण्याला विरोध केला होता त्यांना संदिग्धरित्या मारण्यात आलं.'
आरव्हीएस मणी यांनी आम्ही गृहमंत्रालयात असताना चर्चा करायचो की ज्यावेळी जलालाबादमध्ये चांगलं पीक येतं त्यावेळी भारतात जास्त दहशतवादी हल्ले होतात. आम्ही चर्चा करायचो की बघा रे जलालाबादमध्ये अफीमचं पीक कसं आलं आहे नाहीतर आम्हाला डोकेदुखी होणार आहे.
पॉडकास्टमध्ये त्यांना या ड्रग्ज ट्रॅफिकिंगमध्ये पाकिस्तानच्या मोठ्या व्यक्ती देखील होत्या का असं विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी मोहम्मद आसिफ आणि शोएब अख्तर हे हाय प्रोफाईल व्यक्ती होत्या. त्याचबरोबर इतर देखील लोक असण्याची शक्यता आहे ज्यांनी नावे समोर आलेली नाहीत. मात्र यात संपूर्ण टीम देखील असू शकते.