पुढारी ऑनलाईन डेस्क : जगविख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक विश्वविक्रम त्याच्या नावी केला आहे. सर्व सोशल मीडियावर माध्यमांवर एकूण 1 अब्ज म्हणजेच 100 कोटी फॉलोअर्स आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे. यासाठी त्याने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून थेट मोहिम चालवली आहे. त्याने इन्स्टांग्रामवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. (Cristiano Ronaldo)
या यशाचा आनंद साजरा करताना, त्यांनी एक पोस्टर देखील जारी केले, ज्यावर लिहिले आहे – “वन बिलियन ड्रीम्स, वन जर्नी.” रोनाल्डोने प्रत्येक पावलावर त्याला साथ दिल्याबद्दल, प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या मते, हे 1 अब्ज फोलोअर्सचे कुटुंब सोशल मीडियावर केवळ फुटबॉलवरील प्रेम आणि उत्कंटतेमुळे उदयास आले आहे.
पोर्तुगीज सुपरस्टार रोनाल्डोने अलीकडेच 'उर क्रिस्टियानो' यूट्यूब चॅनल सुरू केले, जिथे त्याने अनेक विक्रम मोडले. 1 दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचणारा तो सर्वात जलद निर्माता बनला. अवघ्या ९० मिनिटांत त्याने ही कामगिरी केली होती. त्याने 12 तासांच्या आत 10 दशलक्ष सब्सक्राइबर्स गाठले. सध्या त्याचे YouTube वर 60.5 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. त्याचे Instagram वर 638 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर X वर 113 दशलक्ष लोक त्याला फॉलो करतात आणि 170 दशलक्ष लोक त्याला Facebook वर फॉलो करतात. याशिवाय चीनच्या सोशल मीडिया वीबोवर ७.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि कुएशौवर ९.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Cristiano Ronaldo)
नुकतेच नेशन्स लीगदरम्यान क्रोएशियाविरुद्ध गोल करत रोनाल्डोने फुटबॉलमध्ये 900 गोल करण्याचा विक्रम केला. हा ऐतिहासिक विक्रम करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. 39 वर्षीय रोनाल्डोने त्याच्या आंतरराष्ट्रीय आणि क्लब फुटबॉल कारकिर्दीत 900 हून अधिक गोल केले आहेत. 2002 मध्ये कारकिर्दीला सुरुवात करणारा रोनाल्डो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 132 गोलांसह अव्वल स्थानावर आहे.