पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवस मैदानात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर चाचपडणार्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अखेर आज इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात सूर गसवला. दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करताना त्याने षटकार मारण्याचा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याचा विक्रमही मोडित काढला आहे. ( Rohit Sharma Six Record )
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये सुरु आहे. या सामन्यात रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने ३९८ वनडे (एकदिवसीय) सामन्यांमध्ये ३५१ षटकार मारले आहेत. आता रोहित या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. रोहितने एकूण ३३३ षटकार मारले होते. आजच्या सामन्यात रोहितने ख्रिस गेलला मागे टाकले. गेलने ३०१ सामन्यांमध्ये ३३१ षटकार ठोकले होते. या यादीत महेंद्रसिंग धोनी यादीत पाचव्या स्थानावर आहे. धोनीने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये २२९ षटकार मारले आहेत.