Rohit Sharma
रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपली छाप पाडताना दिसणार आहे.  File Photo
स्पोर्ट्स

Rohit Sharma : ‘हिट मॅन’ रचणार इतिहास! ‘हा’ नवा विश्वविक्रम नोंदवणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (IND vs SL ODI) आपली छाप पाडताना दिसणार आहे. भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या आधी टीम इंडिया तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असून त्यात सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहेत. त्यानंतरच्या वनडे मालिकेत रोहित कर्णधार असेल. त्याला या मालिकेत कर्णधार म्हणून इतिहास रचण्याची संधी आहे.

खरं तर, जर रोहित (Rohit Sharma) त्याच्या फलंदाजीदरम्यान तीन षटकार मारण्यात यशस्वी ठरला, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार-फलंदाज होईल. एक कर्णधार म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 231 षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याबाबतीत हा विक्रम सध्या इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनच्या नावावर आहे. मॉर्गनने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 233 षटकार ठोकले होते. म्हणजेच तीन षटकार मारताच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मॉर्गनने केलेला विश्वविक्रम मोडेल. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 211 षटकार मारले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 171 षटकार मारण्यात रिकी पाँटिंग यशस्वी ठरला होता.

न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 170 षटकार ठोकले होते. कर्णधार म्हणून कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 138 षटकार मारण्यात यश मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार

इऑन मॉर्गन : 233

रोहित शर्मा : 231

धोनी : 211

रिकी पाँटिंग : 171

बँडम मॅक्युलम : 170

विराट कोहली : 138

भारताचा श्रीलंका दौरा पूर्ण वेळापत्रक

टी-20 मालिका

27 जुलै : 1ला टी-20 सामना : संध्याकाळी 7:00 वाजता

28 जुलै : 2रा टी-20 सामना : संध्याकाळी 7:00 वाजता

30 जुलै : 3रा टी-20 सामना : संध्याकाळी 7:00 वाजता

एकदिवसीय मालिका

2 ऑगस्ट : 1ली वनडे : दुपारी 2:30 वाजता

4 ऑगस्ट : 2री वनडे : दुपारी 2:30 वाजता

7 ऑगस्ट : 3री वनडे : दुपारी 2:30 वाजता

20000 धावांसाठी 923 धावांची गरज

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करण्यापासून 923 धावा दूर आहे. यावर्षी भारताला 9 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत हिटमॅन यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.

SCROLL FOR NEXT