स्पोर्ट्स

Rohit Sharma : ‘आयपीएल’चा सामना संपताच रोहित शर्मा ‘स्टार स्पोर्ट्स’वर का भडकला?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सवर गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळविण्यासाठी आयपीएल प्रसारकांनी क्रिकेटपटूंच्या गोपनीयतेचे उल्लंघन करणे सुरूच ठेवलेही त्‍याने म्‍हटले आहे. (Rohit Sharma)

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्माने म्‍हटलं आहे की, "स्टार स्पोर्ट्सला माझे संभाषण रेकॉर्ड करू नका असे सांगूनही त्यांनी ते रेकॉर्ड केले आणि प्रसारित केले. हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. हे जर असेच सुरू राहिले तर, एक दिवस क्रिकेट विश्वासाला तडा जाईल. जरा बुद्धीने काम करा. तुमच्या आकलनाची व्याप्ती वाढवा."

ऑडिओ क्लीपने समस्या निर्माण केल्या : रोहित शर्मा

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया दिली. याशिवाय काही दिवसांपूर्वी धवल कुलकर्णीसोबतचे संभाषण रेकॉर्ड करताना रोहित कॅमेरामनला ऑडिओ डिलीट करण्याची विविनंती करताना दिसला होता. तो म्हणाला होता, "भाई, ऑडिओ बंद कर. आधीच एका ऑडिओने माझ्यासाठी समस्या निर्माण केल्या आहेत."

आयपीएल 2024 मुंबई इंडियन्ससाठी कठीण होते. संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावर राहिला. हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. मात्र, मुंबईचा कर्णधार म्हणून पहिला हंगाम हार्दिकसाठी चांगला गेला नाही. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित मुंबई फ्रँचायझीसोबत राहतो की दुसरा संघ त्याला लिलावात विकत घेतो हे पाहणे बाकी आहे.

SCROLL FOR NEXT