Virat Kohli
देशातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या टी20 अंतिम सामन्‍यात विराट कोहलीने स्‍मरणीय खेळीचे प्रदर्शन केले.  File Photo
स्पोर्ट्स

Virat Kohli : कर्णधार रोहितचा 'शब्‍द' विराटने केला खरा

पुढारी वृत्तसेवा

देशातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या टी20 अंतिम सामन्‍यात विराट कोहलीने स्‍मरणीय खेळीचे प्रदर्शन केले. सलामीला आलेल्‍या विराट काेहली ( Virat Kohli ) याने ५९ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्‍याने एका अर्थाने कर्णधार रोहित शर्माचा शब्‍द खरा केला आहे. ( ICC Men's T20 World Cup 2024 )

काय म्‍हणाला होता रोहित शर्मा ?

T20 विश्वचषक स्‍पर्धेतील सेमीफायनलमध्‍ये विराट कोहली अपयशी ठरला होता. यानंतर रोहित शर्मा याला विराट कोहलीच्‍या फॉर्मबद्दल प्रश्न विचारला असता तो म्‍हणाला होता की, " विराट कोहली हा एक दर्जेदार खेळाडू आहे. तो सध्‍या ज्‍या टप्‍प्‍यातून जात आहे यातून कोणीही फलंदाज जात असतो. आम्‍हाला त्‍याचा दर्जा माहित आहे. त्याचे महत्त्व आम्हाला कळते. फॉर्म कधीही समस्या नाही. जेव्हा तुम्ही 15 वर्षे क्रिकेट खेळता तेव्हा फॉर्म हा मुद्दा कधीच सतो.त्याचा हेतू एकच आहे. तो कदाचित अंतिम सामन्यासाठी आपले सर्वोत्तम वाचवत असेल." ( ICC Men's T20 World Cup 2024 )

विराट कोहलीची उत्‍कृष्‍ट फलंदाजी

आज अंतिम सामन्‍यात विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. टीम इंडियाने 34 धावांत भारताने कर्णधार रोहित (9), ऋषभ पंत (0) आणि सूर्यकुमार (3) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. भारतीय संघाला कठीण परिस्थितीत एका संयमी खेळीची गरज होती. विराट ही गरज ओळखली. त्‍याने अक्षर पटेलच्या साथीने 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. अक्षर बाद झाल्यावर विराटने शिवम दुबेच्‍या सहाय्‍याने दमदार खेळी कायम ठेवत करत भारताला मजबूत स्थितीत आणले. टीम इंडियाच्‍या १६० धावांच्‍या पुढे मजल मारण्‍यात त्‍याचा सिंहाचा वाटा राहिले. आपल्‍या खेळीने विराटने उपांत्य सामन्‍यानंतर कर्णधार रोहित याने विराटबद्‍दल जो विश्‍वास व्‍यक्‍त केला होता तो एका अर्थाने खरे करुन दाखवले.

SCROLL FOR NEXT