Rohit Sharma Retirement Controversy pudhari
स्पोर्ट्स

Rohit Sharma Retirement Controversy: अगरकर-गंभीर जोडीवर BCCI नाराज... रोहितच्या निवृत्ती प्रकरणाची आतली स्टोरी काय?

Anirudha Sankpal

Rohit Sharma Retirement Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडं सामना हा १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना मालिका खिशात घालण्यासाठी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहेच. त्याचबरोबर रोहित शर्मासाठी देखील हा सामना अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. हा सामना रोहितचा निवृत्तीचा सामना ठरण्याची शक्यता आहे. या सामन्यानंतर रोहित वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. मात्र हा निर्णय तो स्वखूशीनं घेत नसून संघ व्यवस्थापन आणि निवडसमितीकडून तशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे असे वृत्त गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावरून बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी निवडसमिती प्रमुख अजित अगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआय सचिव सैकिया यांनी लॉर्ड्सवरील सामना हा रोहित शर्माचा शेवटचा सामना नाहीये असं स्पष्ट केलं.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी अजित अगरकर आणि गौतम गंभीर या प्रकरणाकडे ज्या प्रकारे पाहत आहेत त्यावर खूश नाहीये. बीसीसीआय सचिव सैकिया यांनी सर्व पदाधिकाख्यांसोबत दिवसभर चर्चा केल्यानंतर एक अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं.

रोहित शर्माला एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी निवडसमिती आणि प्रशिक्षकांनी या निर्णयाबाबत सांगितलं यावरून रोहित नाराज होता. त्याने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याने एका वरिष्ठ खेळाडूसोबत कशा प्रकारे वर्तन केलं जात आहे हे सांगितलं होतं. सैकिया यांनी सांगितलं की रोहित तोपर्यंत भारताकडून खेळत राहणार आहे जोपर्यंत तो स्कीम ऑफ थिंग्जमध्ये आहे.

रोहित ३०० वा सामना खेळणार?

रोहित शर्मा अजून ३०० वनडे सामन्यांच्या क्लबमध्ये सामील व्हायचा आहे. त्याला ३०० वनडे सामन्यांचा टप्पा पार करण्यासाठी १३ सामन्यांची गरज आहे. त्याने आतापर्यंत २८७ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४८.५८ च्या सरासरीने ११ हजार ७७५ धावा केल्या आहेत. त्याने वनडेमध्ये ३३ शतके केली असून जर रोहित २०२७ चा वर्ल्डकप खेळला तर तो सामन्यांचे त्रिशतक नक्कीच पूर्ण करू शकेल. आतापर्यंत भारताच्या फक्त ७ खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळले आहेत. सध्या खेळत असलेला विराट हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर ३०० पेक्षा जास्त वनडे सामने आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT