रोहित शर्मा तर फक्त निमित्त? यशस्वीच्या फ्लाइंग किसची खरी हक्कदार कोण? Pudhari File Photo
स्पोर्ट्स

रोहित शर्मा तर फक्त निमित्त? यशस्वीच्या फ्लाइंग किसची खरी हक्कदार कोण?

भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालचे उलगडले यशाचे रहस्य

अरुण पाटील

ओव्हल : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी धडाकेबाज खेळी करणारा भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या यशाचे रहस्य उलगडले आहे. यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात शतक झळकावले त्यावेळी जो हार्ट इमोजी बनवून स्टँडकडे इशारा केला तो रोहित शर्मासाठी नव्हे तर एका खास व्यक्तीसाठी म्हणजेच जैयस्वालच्या 'सैयारा' साठी होता.

जैयस्वालचा रोहीतवर डोळा 'सैयारा' वर निशाना

लीड्समध्ये शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला मालिकेत धावा मिळत होत्या पण शतक नाही आणि जेव्हा त्याने ओव्हलमध्ये शतक झळकावले तेव्हा तो एखाद्या खास व्यक्तीला समर्पित करण्यास चुकला नाही. शतक पूर्ण करताच जयस्वालने रोहित शर्मा बसलेल्या स्टँडकडे फ्लाइंग किस आणि हार्ट इमोजी दाखवला पण कथेत एक ट्विस्ट आला कारण जयस्वालची मैत्रीण मॅडी हॅमिल्टन देखील त्याच जागी बसली होती, जिचा चेहरा कॅमेऱ्याला दिसत नव्हता पण सामना संपल्यानंतर ती त्याच स्टँडमधून पांढऱ्या टी-शर्टमध्ये बाहेर आली आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य सांगत होते की जयस्वालने रोहीतला नाही तर गर्लफ्रेंडला लक्ष्य' केले होते.

जैयस्वालचा रोहीतवर डोळा 'सैयारा' वर निशाना

लीड्समध्ये शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैयस्वालला मालिकेत धावा मिळत होत्या पण शतक नाही आणि जेव्हा त्याने ओव्हलमध्ये शतक झळकावले तेव्हा तो एखाद्या खास व्यक्तीला समर्पित करण्यास चुकला नाही. शतक पूर्ण करताच जयस्वालने रोहित शर्मा बसलेल्या स्टँडकडे फ्लाइंग किस आणि हार्ट इमोजी दाखवला पण कथेत एक ट्विस्ट आला. कारण जैयस्वालची मैत्रीण मॅडी हॅमिल्टन देखील त्याच जागी बसली होती, जिचा चेहरा कॅमेऱ्याला दिसत नव्हता, पण सामना संपल्यानंतर ती त्याच स्टँडमधून पांढऱ्या टी-शर्टमध्ये बाहेर आली आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य सांगत होते की जैयस्वालने रोहीतला नाही तर त्याच्या गर्लफ्रेंडला लक्ष्य' केले होते.

कोण आहे ती मॅडी हॅमिल्टन

जैयस्वालचे नाव इंग्लंडमधील रहिवासी मॅडी हॅमिल्टनशी जोडले जात आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मॅडीने यशस्वीला अनेक वेळा पाठिंबा देतानाही पाहिले आहे. मॅडी ही एक न्यूट्रिशनिस्ट (आहारतज्ज्ञ) आहे आणि अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर फिटनेसशी संबंधित पोस्ट पोस्ट करते. मॅडी स्वतः खूपच तंदुरुस्त आहे आणि फिटनेसबाबत चॅलेंजेस घेत राहते. मॅडीने ७५ कठीण चॅलेंजेस देखील स्वीकारल्या आहेत. मॅडी हॅमिल्टनला आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालला पाठिंबा देताना अनेक वेळा स्टँडमध्ये पाहिले आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमधील काही फोटो देखील शेअर केले आहेत. जैयस्वाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.

जैस्वालची आकाशदीपसोबत भागीदारी

जैस्वालने दिवसाची सुरुवात नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपसोबत एक मोठी भागीदारी रचून केली. या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १५० चेंडूंत १०७ धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या ख्रिस वोक्सशिवाय खेळणाऱ्या कमकुवत गोलंदाजीची हवाच काढून टाकली. आकाशदीपनेही आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकावत ९४ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची शानदार खेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT