रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.  File Photo
स्पोर्ट्स

Rohit Sharma : रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास

रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

arun patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या 51 व्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. डावातील 5 वा षटकार मारताच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

* रोहितने केले ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक

* रोहित शर्माचे त्याच्या T20 कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक

* 600 षटकार मारणारा पहिला फलंदाज

* रोहितने 50 धावा पूर्ण केल्या तेव्हा भारतीय संघाच्या 52 धावा

600 षटकार मारणारा पहिला फलंदाज

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 608 षटकार मारले आहेत. 600 षटकार पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटीत 84, एकदिवसीय सामन्यात 323 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 203 षटकार फटकावले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही फलंदाजाला 180 षटकारही मारता आलेले नाहीत. न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मार्टिन गुप्टिल 173 षटकारांसह दुसऱ्या तर जोस बटलर 136 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक

या सामन्यात रोहित शर्माने 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. रोहितने भारतीय डावाच्या 5व्या षटकातच अर्धशतक झळकावले. या टी-20 विश्वचषकातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. रोहितने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक केले होते. रोहित शर्माने 50 धावा पूर्ण केल्या तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 52 धावा होती. यामध्ये एक धाव वाइडची आणि एक धाव पंतच्या बॅटमधून आली होती.

टी-20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

203 षटकार : रोहित शर्मा

173 षटकार : मार्टिन गुप्टिल

137 षटकार : जोस बटलर

132 षटकार : निकोलस पूरन

130 षटकार : ग्लेन मॅक्सवेल

रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी आहे?

रोहितने 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतून त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आत्तापर्यंत 157 सामने खेळले असून 149 डावांमध्ये सुमारे 31 च्या सरासरीने 4,165 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 5 शतके आणि 31 अर्धशतके फटकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 121 आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने 45 सामन्यांमध्ये 33.18 च्या सरासरीने 1,100 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT