Rohit Sharma Vada Pav Viral Vijay Hazare: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ आपल्या फलंदाजीसाठीच नाही, तर त्याच्या मोकळ्या आणि दिलखुलास स्वभावासाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सध्या त्याची मजेशीर रिअॅक्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बुधवारी रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसला. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई आणि सिक्किम यांच्यात सामना सुरू होता. यावेळी रोहित बाउंड्री लाईनवर फील्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून एका चाहत्याने प्रश्न विचारला, “रोहित भाई, वडा पाव खाणार का?”
हा प्रश्न ऐकताच रोहित शर्मा हसला आणि हात हलवून नकार दिला. हा साधा, पण दिलखुलास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोहित शर्माने तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन केलं. रोहितला पाहण्यासाठी सुमारे 10 हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते.
मैदानावरही रोहित शर्माने चाहत्यांना निराश केलं नाही.
▪️ 61 चेंडूत शतक,
▪️ 94 चेंडूत 155 धावा,
▪️ 18 चौकार आणि 9 षटकार
अशी जबरदस्त खेळी त्याने केली.
रोहितच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने 8 गडी राखून आणि 117 चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकला.