Rishabh Pant pudhari
स्पोर्ट्स

Rishabh Pant: तुम्ही विराट कोहली असत नाही तोपर्यंत... वनडे टी २० संघातील स्थान गमावलेला पंत नेमकं काय म्हणाला?

ऋषभ पंत सध्या इराणी ट्रॉफी खेळत असून तिथूनच त्याची न्यूझीलंड दौऱ्याची तयारी सुरू होणार आहे.

Anirudha Sankpal

Rishabh Pant: भारतीय कसोटी संघातील खेळाडू ऋषभ पंत सध्या इराणी ट्रॉफीत उर्वरित भारताच्या संघाचे नेतृत्व करत आहे. पंत कधी काळी तीनही फॉरमॅटमध्ये संघातील हक्काचा खेळाडू होता. मात्र दुखापत आणि फॉर्म याच्यामुळे त्याला वनडे आणि टी २० मधील आपलं स्थान गमवावं लागलं. तो अनेक दिवसांपासून मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसलेला नाही. याबाबत बोलताना त्याने एका खेळाडूच्या करिअरमध्ये चढ-उतार होत असतात असं वक्तव्य केलं.

ऋषभ पंत बिजनेस ऑफ स्पोर्ट पॉडकास्टमध्ये बोलत होता. त्यावेळी त्याने वनडे संघातून बाहेर होण्याबाबत वक्तव्य केलं. तो म्हणाला, 'नक्कीच तुम्हाला वाईट वाटतं. मात्र खेळाडू म्हणून तुम्हाला ज्यावेळी एखादी बाधा येते त्यातून तुम्ही पुनरागमन देखील करता.'

पंत पुढे विराट कोहलीचे उदाहरण दिलं. तो म्हणाला, 'एक खेळाडू म्हणून तुमच्या कारकिर्दीचा ग्राफ हा वर खाली होत राहतो. जोपर्यंत तुम्ही विराट कोहली होत नाहीत तोपर्यंत हे होत राहतं. तो एक स्पेशल खेळाडू आहे.'

ऋषभ पंत हा काही काळापूर्वी कसोटी संघाचा उपकर्णधार देखील राहिला आहे. मात्र त्याच्याकडून हे देखील पद काढून घेण्यात आलं. कसोटी क्रिकेटमध्ये पंत आता फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून खेळतोय. मात्र ऋषभ पंत हा असा खेळाडू आहे जो एकट्याच्या हिंमतीवर सामन्याचं चित्र पालटू शकतो.

तो कायम आक्रमक क्रिकेट खेळला आहे. त्यात त्याला यश देखील मिळालं आहे. त्याच्यावर कधी कधी टीका देखील होते. मात्र संघ व्यवस्थापनाचा त्याला पाठिंबा राहिला आहे. आता त्याची न्यूझीलंड दौऱ्याची तयारी इराणी ट्रॉफीपासून सुरू होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT