ऋषभ पंत दिल्लीमधून होणार एक्झिट file photo
स्पोर्ट्स

ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समधून होणार एक्झिट; 'या' संघाशी करणार हातमिळवणी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा स्टार भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुढील वर्षी होणाऱ्या लिलावापूर्वी फ्रँचायझी सोडून चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होऊ शकतो. दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन पंतच्या कामगिरीवर नाराज आहे. त्यामुळे त्याला आयपीएल २०२५ (IPL 2025) साठी कायम ठेवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ऋषभ पंतही (Rishabh Pant) आयपीएल २०२५ पर्यंत नवीन फ्रँचायझीचा भाग बनण्याचा विचार करत आहे. दिल्ली कॅपिटल्सने अलीकडेच त्यांचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगची हकालपट्टी केली होती, ते पंतच्या जागीही दुसरा खेळाडू शोधत आहेत. एका भीषण कार अपघातानंतर जवळपास एक वर्ष बाहेर राहिल्यानंतर पंतने आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत पुनरागमन केले. एका रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन पंतच्या कामगिरीवर खूश नाही. त्यामुळे त्याला आयपीएल २०२५ (IPL 2025) साठी कायम ठेवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र सौरव गांगुलीने पंतला कर्णधारपदी ठेवण्याचा आग्रह धरल्याचे समजते. दरम्यान, पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

'अशी' आहे पंतची IPL कारकिर्द

ऋषभ पंतची (Rishabh Pant) आतापर्यंतची आयपीएलमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गेल्या मोसमात दुखापतीतून पुनरागमन करताना त्याने चांगली फलंदाजी केली. त्याने आयपीएल २०२४ मध्ये डीसीसाठी एकूण १३ सामन्यांमध्ये भाग घेतला. १३ डावात त्याने ४०.५४ च्या सरासरीने ४४६ धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट १५५.४० होता. पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १११ सामने खेळले आहेत. ११० डावांमध्ये ३५.३१ च्या सरासरीने ३२८४ धावा केल्या आहेत. पंतच्या नावावर आयपीएलमध्ये १ शतक आणि १८ अर्धशतकं आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी १२८ धावांची आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT