पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (दि.१९ सप्टेंबर) पासून चेन्नईत खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिकंत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाज हसन महमूद याने अवघ्या ३४ धावांवर भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेला ऋषभ पंतचा बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दासशी वाद झाला. ( India vs bangladesh Test )जाणून घेवूया सामन्यात नेमकं काय घडलं या विषयी...
30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. उपचारानंतर आता तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला होता. आता भारताने झटपट विकेट गमावल्यानंतर ऋषभवर मोठी जबाबदारी होती. त्यानेही आपला नैसर्गिक खेळ कायम राखत आक्रमक फलंदाजी सुरु केली. मात्र यावेळी एक थ्रो त्यांच्या अंगावर आला. यामुळे तो नाराज झाला;आणि त्याने दास यांच्याशी दिलेले शब्द स्टंपच्या मायक्रोफोनवर टिपले गेले. ऋषभ लिटन दासला विचारणा केली की, "मेरे को क्यू मार रहे हो? (तुम्ही मला का मारता आहात), यावर बांगलादेशच्या स्टंपरने उत्तर दिले: "वो तो फेकेगा ही ना (त्याला फेकणे आहे)." यानंतर मात्र ऋषभने फलंदाजीवर मन एकाग्र केलं. पहिल्या 10 षटकांत भारताची 3 बाद 34 अशी अवस्था केल्यानंतर, पंत (33*) आणि यशस्वी जैस्वाल (37*) यांनी 54 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. अखेर ३९ धावांवर खेळणार्या पंतला हसन मेहमूद याने यष्टिरक्षक दासकरवी झेलबाद करत बाद केले.
चेन्नई कसोटीत नाणेफेक जिंकत बांगलादेशने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. हसन महमूद याने ढगाळ हवामानाचा अचूक फायदा घेत भारताला १४ धावांवर पहिला धक्का दिला. सहाव्या षटकात हसन महमूदचा चेंडू रोहितच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये कर्णधार शांतोच्या हातात गेला. रोहित केवळ सहा धावांवर बाद झाला. यानंतर २८ धावांवर भारताला दुसर्या धक्का बसला. शुभमन गिल याला हसन महमूद याने खाते उघडण्याचीही संधी दिली नाही. हसम महमूदने शुभमनला यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद केले. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद २९ धावा होती. यानंतर डावाच्या 10व्या षटकात हसन महमूदने विराट कोहलीला यष्टिरक्षक लिटन दासकडे झेलबाद केले. विराटला सहा धावा करता आल्या. भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणार्या ऋषभ पंत यालही हसन महमूद याने यष्टिरक्षक लिटन दासच्या हाती झेलबाद देण्यास भाग पाडले. रोहित, शुभमन, विराट आणि ऋषभ यांना बाद करत हसन याने भारताच्या डावालाच खिंडार पाडले.