स्पोर्ट्स

रिंकूच्या धाडसाचे कौतुक करायला हवे : मोहम्मद कैफ

Arun Patil

रसेलसारख्या दिग्गज खेळाडूला स्ट्राईकवरून हटवून स्वत: स्ट्राईक घेणे यासाठी आत्मविश्वास आणि मोठे धाडस लागते. ते रिंकूने दाखवले. त्याचे कौतुक करायला पाहिजे, असे क्रिकेट समालोचक मोहम्मद कैफ याने म्हटले आहे.

केकेआरच्या संघाला विजयासाठी अंतिम षटकात सहा धावांची आवश्यकता होती. अशा स्थितीत पंजाबचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप सिंगवर विश्वास दाखवला. अर्शदीपने सुरुवातीचे पाच चेंडू अप्रतिम टाकून केकेआरच्या अडचणीत वाढ केली होती. अर्शदीपपुढे रसेल अडखळताना पाहून अखेरच्या चेंडूत दोन धावांची गरज असताना रिंकूने स्ट्राईक घेतले अन् चौकार मारला. रिंकूच्या याच धाडसाचे कौतुक कैफने केले आहे.

स्टार स्पोर्टस्शी बोलताना कैफने म्हटले, अखेरच्या आणि निर्णायक चेंडूवर रसेलसारख्या खेळाडूला स्ट्राईक रोटेट करण्यास सांगण्याचे श्रेय रिंकूला जाते. रिंकू सिंगसारख्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूने रसेलसारख्या फिनिशरला नॉन स्ट्रायकरवर जाण्यास सांगणे, यावरून या खेळाडूचा त्याच्या खेळीवर असलेला आत्मविश्वास दिसून येतो. हेच आयपीएलचे वैशिष्ट्य आहे.

SCROLL FOR NEXT