कोल्हापूर : स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्टस् अॅकॅडमी व प्राचार्य एस. एस. चव्हाण गौरव समिती यांच्यावतीने पेटाळा स्कूल गेम्स अंतर्गत १४, १७, १९ वर्षांखालील विभागीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात झाल्या. यात ५४ खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे असा :
१४ वयोगट मुले ऋग्वेद खोत, आदित्य पाटील, सोहम लंबे, विनोद चव्हाण. मुली - भार्गवी पाटील, ऐश्वर्या चव्हाण, सान्वी घाटगे, नावीन्या लोहार. १७ मुले- वेदांत लेले, शिवेंद्र काटकर, तीर्थ पवार, सोहम शेळके. मुली - स्नेहांकिता चौगुले, वैष्णवी पाटील, पद्मजा पाटील, सृष्टी हारुगले. १९ मुले प्रणव पवार, आयुष खोत, संचित गायकवाड, प्रथमेश जाधव.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्राचार्य पी. एस. हेरवाडे, वेद अॅकॅडमीचे रोहित हावलदार, मुख्याध्यापक डी. ए. मुजावर, मुख्याध्यापक एस. के. तांदळे, उमा भेंडीगिरी, पी. एच. पोवार, कु. वैजयंती पाटील, महेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून अभिजित धनवडे, प्रवीण साळोखे, धैर्यशील देसाई, निखिल लोहार, वैष्णवी पाडळकर यांनी काम पाहिले. बक्षीस समारंभ एस. एम. शिकलगार, प्राचार्य वाय. एस. पवार रोहित हावलदार, पी. बी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सयाजीराव पाटील, एस. एल. हावळ, आर. जी. घाटगे, प्रदीप घाटगे उपस्थित होते. प्रास्ताविक पी. बी. पाटील यांनी केले. स्पर्धेचे संयोजन सयाजीराव पाटील, अक्षय मुळीक, नरके, प्रेमावती पाटील, स्वरूप माने, गौरव जाधव यांनी केले.