स्पोर्ट्स

IPL 2024 RCB vs RR : विराट कोहली पूर्ण करणार 8000 धावा! फक्त 29 धावा करताच रचणार इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 चा एलिमिनेटर 1 आज (दि. 22) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पोहोचेल. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला नवा विक्रम रचण्याची संधी आहे. त्याच्या बॅटमधून 29 धावा येताच तो आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा पहिला फलंदाज बनणार आहे.

आजचा सामना जो संघ जिंकेल त्यांची एलिमिनेटर 2 साठीची लढत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादशी होईल. तर एलिमिनेटर 1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला गाशा गुंडाळावा लागणार आहे.

कोहली रचणार इतिहास!

खरंतर, विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 7971 धावा केल्या आहेत. जर हा फलंदाज राजस्थान रॉयल्सविरुद्ध 29 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो 8 हजार धावांचा आकडा गाठेल. अशाप्रकारे कोहली आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे.

यंदाच्या आयपीएल हंगामात कोहलीची बॅट तळपली आहे. त्याने आतापर्यंत 14 सामन्यात 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटने 708 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 59 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत. तसेच, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हा फलंदाज अव्वल स्थाने आहे.

कोहलीची कारकीर्द

कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. अशाप्रकारे तो आयपीएलचा 17वा हंगाम खेळत आहे. यादरम्यान त्याने आतापर्यंत 251 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये या अनुभवी फलंदाजाने 38.69 च्या सरासरीने आणि 131.95 च्या स्ट्राईक रेटने 7971 धावा केल्या आहेत. त्याने 8 शतके झळकावली असून 55 अर्धशतके फटकावली आहेत. मात्र, आतापर्यंत कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT