स्पोर्ट्स

IPL Final च्या पहिल्याच षटकात RCBने इतिहास रचला, CSKचा विक्रम मोडला

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू इतिहास रचला.

रणजित गायकवाड

आयपीएल 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर, विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आरसीबी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊन पहिल्याच षटकात नवा इतिहास रचला.

खरंतर, पंजाब किंग्जकडून पहिले षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग आला. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर फिल सॉल्टने 2 डॉट बॉल खेळल्यानंतर तिसऱ्या षटकार मारला. पुढच्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि त्यानंतर 5 व्या चेंडूवर चौकार लागला. शेवटच्या चेंडूवर एकही धाव आली नाही. अशाप्रकारे, आरसीबी संघाने पहिल्या षटकात 13 धावा करून एक नवा विक्रम रचला.

सीएसकेचा विक्रम मोडला

आरसीबी संघ आयपीएल फायनलच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारा संघ बनला. आरसीबीने 5 वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा विक्रम मोडला. यापूर्वी, आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या षटकात चेन्नईने गुजरात टायटन्सविरुद्ध 10 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात चेन्नईने गुजरातला हरवले आणि 5 व्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा

  • 13/0 : आरसीबी विरुद्ध पीबीकेएस, अहमदाबाद, 2025*

  • 10/0 : सीएसके विरुद्ध जीटी, अहमदाबाद, 2023

  • 10/1 : केकेआर विरुद्ध पीबीकेएस, बेंगळुरू, 2014

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे :

आरसीबीचे प्लेइंग इलेव्हन :

फिलिप साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड.

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन :

प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT