rcb record in ipl 2025 first team to win all 7 away matches in single season
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) ने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या पहिल्या क्वालिफायरसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. मंगळवारी (दि. 27) लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर शेवटच्या लीग सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) वर मात केली. या विजयासह, आरसीबीने एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवत आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामात सर्व अवे सामने जिंकणारा पहिला संघ बनला.
लखनौचा कर्णधार ऋषभ पंतच्या नाबाद 118 धावांच्या खेळीच्या जोरावर सुपर जायंट्सने तीन विकेट गमावून 227 धावा केल्या, परंतु आरसीबीने 18.4 षटकांत चार विकेट गमावून 230 धावा करून लीगमधील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला. रॉयल चॅलेंजर्सचा हा घराबाहेरील सलग 7 वा विजय ठरला. या विजयासह, आरसीबीने क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यांनी 14 सामन्यांतून 19 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. आता गुरुवारी (दि. 29) अव्वल क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्जशी त्यांचा सामना रंगणार आहे. तर शुक्रवारी (दि. 30) एलिमिनेटर 1 मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने असतील.
आरसीबीने कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे झालेल्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध 7 विकेटने विजय मिळवून चालू आयपीएल हंगामातील आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. घराबाहेरील ही विजयाची मालिका त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली.
22 मार्च : केकेआरवर 7 विकेट्सने विजय : (कोलकाता, इडन गार्डन स्टेडियम)
28 मार्च : सीएसकेचा 50 धावांनी पराभव : (चेनई, चेपॉक स्टेडियम)
7 एप्रिल : मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय : (मुंबई, वानखेडे स्टेडियम)
13 एप्रिल : राजस्थान रॉयल्सचा 9 विकेट्सने पराभव : (जयपूर, सवाई मानसिंग स्टेडियम)
20 एप्रिल : पंजाब किंग्जवर 7 विकेट्सने विजय (चंदीगड, मुल्लानपूर स्टेडियम)
27 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सने विजय (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
27 मे : लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव (लखनौ, एकाना स्टेडियम)
तथापि, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकाना येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना गमावला होता, परंतु खराब हवामानाच्या अंदाजामुळे तो सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथून हलवण्यात आला. त्यामुळे एकाना हा आरसीबी विरुद्ध एसआरएच सामन्यासाठी होम गेमच (किंवा तटस्थ ठिकाण) राहिला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : आयपीएल 2025 मध्ये 7 पैकी 7 सामने जिंकले
मुंबई इंडियन्स : आयपीएल 2012 मध्ये 7 पैकी 8 सामने जिंकले
कोलकाता नाईट रायडर्स : आयपीएल 2012 मध्ये 7 पैकी 8 सामने जिंकले
गुजरात टायटन्स : आयपीएल 2023 मध्ये 6 पैकी 7 सामने जिंकले
दिल्ली डेअरडेव्हिल्स (डीसी) - आयपीएल 2012 मध्ये 6 पैकी 8 सामने जिंकले