8 Players Traded IPL 2026: IPL 2026च्या रिटेन्शन घोषणेपूर्वीच क्रिकेटविश्वात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. इंडियन प्रीमियर लीगमधील अनेक प्रमुख खेळाडूंच्या ट्रेडची अधिकृत घोषणा झाली असून या यादीत सर्वात चर्चेचे नाव म्हणजे रवींद्र जडेजा. दीर्घकाळ CSK सोबत असणारा जडेजा आता अधिकृतपणे चेन्नई सुपर किंग्जचा निरोप घेऊन राजस्थान रॉयल्समध्ये (RR) दाखल झाला आहे.
राजस्थान रॉयल्सने जडेजाला 14 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. CSKसाठी सहा हंगामांहून अधिक काळ खेळलेला आणि संघाला विजेतेपदी नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला जडेजा राजस्थानसाठी आगामी हंगामासाठी मोठा आधार असणार आहे.
जडेजाच्या जागी चेन्नईने मोठा निर्णय घेत संपूर्ण IPLमध्ये सर्वाधिक पसंतीचा खेळाडू असलेल्या संजू सॅमसनला 18 कोटींमध्ये ट्रेड करून आपल्याकडे घेतले आहे. राजस्थानकडून दीर्घकाळ खेळणारा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संजू आता कोचिंग स्टाफ आणि MS धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली CSKसाठी खेळणार आहे. हा बदल CSKच्या आगामी तीन वर्षांच्या धोरणाचा भाग असल्याची चर्चा आहे.
CSKसाठी हा निर्णय किती कठीण होता, याची कबुली संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर के.एस. विश्वनाथन यांनी स्वतः दिली. दशकाहून अधिक काळ संघाचा आधारस्तंभ राहिलेला रवींद्र जडेजा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सॅम करण, या दोघांना निरोप देणे हे फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वांत कठीण निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले.
विश्वनाथन यांनी सांगितले की दोन्ही खेळाडूंशी सविस्तर चर्चा करून, त्यांच्या पूर्ण सहमतीने हा निर्णय घेतला गेला आहे. CSKसाठी जडेजाने दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. जडेजा आणि करण यांच्या भावी प्रवासासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
संजू सॅमसन (CSKकडे ट्रेड) – 18 कोटी रुपये
रवींद्र जडेजा (RRकडे ट्रेड) – 14 कोटी रुपये
सॅम करण (RRकडे ट्रेड) – 2.4 कोटी रुपये
मोहम्मद शमी (LSGकडे ट्रेड) – 10 कोटी रुपये
मयंक मारकंडे (MIकडे ट्रेड) – 30 लाख रुपये
अर्जुन तेंडुलकर (LSGकडे ट्रेड) – 30 लाख रुपये
नीतीश राणा (DCकडे ट्रेड) – 4.2 कोटी रुपये
डोनोवन फरेरा (RRकडे ट्रेड) – 1 कोटी रुपये