रवींद्र जडेजा File Photo
स्पोर्ट्स

Ravindra Jadeja ने ICC क्रमवारीत रचला नवा विक्रम!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja ICC Test Rankings : रवींद्र जडेजाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता आपले संपूर्ण लक्ष कसोटी आणि वनडेवर केंद्रीत केले आहे. दरम्यान, चेन्नईत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीनंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत जडेजाने नवा विक्रम रचला आहे, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता.

अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीत जडेजा अव्वल

आयसीसीच्या अष्टपैलू कसोटी क्रमवारीत जडेजाने अव्वल स्थान कामय ठेवले आहे. त्याचे रेटिंग 475 झाले आहे. हे त्याचे सर्वकालीन सर्वोच्च रेटिंग आहे. बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. यातही जडेजा खेळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले तरी जडेजाला बाहेर बसणे अशक्य वाटते. याचा अर्थ जडेजाला आपले रेटिंग सुधारण्याची आणखी मोठी संधी आहे.

अश्विन दुसऱ्या स्थानावर

विशेष म्हणजे चेन्नई कसोटीत जडेजाचा जोडीदार रविचंद्रन अश्विनने फलंदाजी अणि गोलंदाजीत चमक दाखली. पहिल्या डावात शतक झळकावले तर दुस-या डावात सहा विकेट घेतल्या. या चमकदार कामगिरीचा त्याला कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. अश्विनचे ​​रेटिंग 370 झाले आहे. क्रमवारीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जड्डू-अश्विनची चेन्नई कसोटीत अप्रतिम कामगिरी

बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत जड्डू आणि अश्विनने धमाकेदार कामगिरी केली. जडेजाने पहिल्या डावात 86 धावा केल्या होत्या, तर अश्विनने 113 धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळाली नाही, मात्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 3 आणि अश्विनने 6 बळी घेतले. त्याला सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT