Ravichandran Ashwin BCCI pudhari
स्पोर्ट्स

Ravichandran Ashwin BCCI: जबाबदारी निश्चित केली पाहिजे... अश्विनने BCCI लाच धारेवर धरलं; भारतीय क्रिकेटमध्ये नेमकं काय घडतंय?

निवडसमिती अन् बीसीसीआय सीईओंमध्येच समन्वय नाही, खेळाडूंच्या दुखपतींचा प्रश्न गंभीर

Anirudha Sankpal

Ravichandran Ashwin BCCI Accountability: बीसीसीआयच्या सेंटर फॉर एक्सिलंन्सवर सध्या खूप प्रश्न उपस्थित होत आहेत. अशी माहिती समोर आली आहे की निवडसमिती आणि बीसीसीआय सीईओ यांच्यातच संघ निवडीवरून समन्वय दिसत नाहीये. निवडसमितीने जे अजून पूर्णपणे फिट नाहीयेत अशा खेळाडूंची संघात निवड केली होती.

अफगाणिस्तान विरूद्धच्या टी २० मालिकेत देखील हेच चित्र पहायला मिळालं होतं. जसप्रीत बुमराहची श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली. मात्र तो मालिका सुरू होण्यापर्यंत फिट झाला नाही. तो थेट अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतच फिट झाला. वरूण चक्रवर्तीबाबत देखील असंच झालं. त्यानंतर आता माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने बीसीसीआयच्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

आता जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे

भारताचा माजी स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने सेंटर ऑफ एक्सीलन्सवर काही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे असं मत मांडलं. तो आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'मला वाटतं की कसोटी, वनडे आणि टी २० साठी वेगवेगळे संघ तयार करण्याची वेळ आता आली आहे. एक किंवा दोन खेळाडू दोन फॉरमॅट खेळू शकतील. मला वाटतं की पुढे जाऊन खेळाडूंच्या दुखापतींचे मॅनेजमेंटबाबत जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.'

नुकतेच आपण पाहिले की अफगाणिस्तान मालिकेसाठी ४ असे खेळाडू निवडले जे फिट नव्हते. मालिका सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी ते फिट झाले. हर्षित राणा अजूनही पुनरागमन करू शकलेला नाही. त्याला रिहॅबिलिटेशन दरम्यान पुन्हा दुखापत झाली होती.

वरूण चक्रवर्तीचे पुनरागमन व्हायला हवे होते

अश्विनने वरूण चक्रवर्तीचे देखील उदाहरण दिले. तो म्हणाला, 'मला माहिती आहे की वरूण चक्रवर्ती गेल्या तीन चार महिन्यांपासून एनसीएमध्ये होते. आम्ही तमिळनाडू प्रीमियर लीगसाठी त्याला रिलीज करा म्हणून परवानगी मागत होतो मात्र त्यांनी ती दिली नाही. त्याने दुखापतीतून सावरून एका महिन्यात पुनरागमन करायला हवं होतं. मात्र तो दोन - तीन महिन्यापासून तिथंच आहे.

अश्विनने आपलेही उदाहरण दिलं

भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनने सांगितलं की, 'एक खेळाडू म्हणून तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगची पद्धत योग्य आहे की नाही हे बघावं लागेल. मी करतोय ते व्यायाम योग्य आहेत का २०१५ मध्ये मला फक्त ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमुळं साईड स्ट्रेन झालं होतं. त्यानंतर मी स्नॅचिंग व्यायाम बंद केला.

अश्विन पुढे म्हणाला की, ऑलिम्पिक लिफ्टिंगने तुम्ही नक्कीच फिल्डवर चपळ व्हाल. तुमची पॉवर प्रोडक्शन वाढेल. मात्र जर तुम्हाला अशी दुखापत झाली जी तुम्हाला सूट करत नाही तर अवघड होतं. त्यामुळं खेळाडूंनी देखील तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवलं पाहिजे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT