स्पोर्ट्स

IND vs WI Test : "दुबईहून थेट हॉट सीटवर!" : शास्त्रींकडून पायक्रॉफ्ट यांचे 'स्वागत'; पाकिस्तानवर अप्रत्यक्ष 'वार'

भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्यापूर्वी शास्त्रींच्या मिश्किल भाष्याने पाकिस्तानचा 'हँडशेक वाद' पुन्हा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

IND vs WI Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून पहिली कसोटी सुरू झाली आहे. या सामन्यापूर्वी सामनाधिकारी (Match Referee) अँडी पायक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांचे समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अत्यंत खास आणि मिश्किल शब्दांत स्वागत केले. शास्त्रींच्या या अनोख्या सलामीने 'आशिया चषक २०२५' (Asia Cup 2025) मधील 'नो-हँडशेक' (No Handshake) वादामुळे झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.

PCBच्‍या बेछूट आरोपांमुळे पायक्रॉफ्‍ट चर्चेत

पंच पायक्रॉफ्ट हे मूळचे झिम्बाब्वेचे (Zimbabwe) आहेत. ते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत सामनाधिकारी आहेत. आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट-टप्प्यातील सामन्यात ‘हँडशेक न करण्याच्या’ (हात मिळवणी न करण्याच्या) प्रकरणानंतर त्यांनी खेळाडूवृत्तीचे पालन केले नाही, असा दावा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केला होता. या संपूर्ण वादामुळे पायक्रॉफ्ट चर्चेत आले होते.

रवी शास्त्री नेमकं काय म्हणाले?

पहिल्या कसोटीच्या नाणेफेकीच्या (Toss) वेळी रवी शास्त्रींनी त्यांचा आवाज वाढवत पायक्रॉफ्ट यांची ओळख करून दिली. दुबईतील आशिया चषक वादावर मिश्किलपणे भाष्य करत त्यांनी म्हटले, "पायक्रॉफ्ट हे परत घरी आले आहेत – थेट दुबईहून, 'हॉट सीट'वर. अँडी पायक्रॉफ्ट!"या खास परिचयानंतर पायक्रॉफ्ट यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरले आणि त्यांना हा उल्लेख नेमका कशासाठी आहे, हे समजले.

IND vs WI Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून पहिली कसोटी सुरू झाली आहे. या सामन्यापूर्वी सामनाधिकारी (Match Referee) अँडी पायक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांचे समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अत्यंत खास आणि मिश्किल शब्दांत स्वागत केले.

भारत-पाकिस्तान सामन्यावेळी काय घडलं होतं?

आशिया चषक स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान साखळी सामन्यानिमित्त आमने-सामने होते. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. या सामन्यात पायक्रॉफ्ट हे पंच होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) ICC कडे अधिकृत तक्रार दाखल केली आणि पायक्रॉफ्ट यांना उर्वरित स्पर्धेसाठी सामनाधिकारी पदावरून हटवण्याची मागणी केली.मागण्या पूर्ण न झाल्यास स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीही पीसीबीने दिली होती. मात्र ICC ने पीसीबीची मागणी फेटाळून लावत त्यांच्या युक्तिवादात काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. पायक्रॉफ्ट यांनी केवळ BCCI चा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचवला, असे ICC ने नमूद केले.या वादामुळे पाकिस्तान आणि यूएई (UAE) यांच्यातील पुढील सामना एका तासाने उशिरा सुरू झाला, कारण पीसीबीने त्यांच्या पर्यायांचा विचार करण्यास वेळ घेतला.

पीसीबीने पसरवली पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याची अफवा

पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पीसीबीने एक निवेदन जारी केले. भारतविरुद्धच्या सामन्यात झालेल्या गैरसमजाबद्दल पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली असल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्याच्या समर्थनार्थ पीसीबीने सोशल मीडियावर एक व्हिडीओही पोस्ट केला, ज्यात पायक्रॉफ्ट पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा आणि प्रशिक्षक माईक हेसन यांच्याशी बोलताना दिसत होते – परंतु त्या क्लिपमध्ये आवाज (Audio) नव्हता.त्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी माजी बोर्ड प्रमुख रमीझ राजा यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. पायक्रॉफ्ट हे भारतासाठी ‘फिक्सर’ (permanent fixer) आहेत, असा गंभीर आरोप रमीझ राजा यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT