Rajiv Shukla Praised Sonal Dinusha pudhari
स्पोर्ट्स

Rajiv Shukla Praised Sonal Dinusha: तो तेंडुलकरसारखा दिसतो, मोठं क्रिकेट खेळेल... BCCI उपाध्यक्षांचे सोनल दनुशासाठी ट्विट

Anirudha Sankpal

Rajiv Shukla Praised Sonal Dinusha: बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी श्रीलंकेचा दर्जेदार फलंदाज सोनल दनुशाचे तोंडभरून कौतुक केलं. सोनल दनुशाने भारतासोबतच्या या दोन कसोटी सामन्यात सलग चौथे अर्धशतक ठोकलं आहे. त्याच्या खेळावर राजीव शुक्ला फिदा झाले असून त्यासाठी त्यांनी खास ट्विट केलं.

श्रीलेंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी भारत यजमानांना लवकर गुंडाळून सामना खिशात घालण्याच्या तयारीत होता. मात्र २५ वर्षाचा श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज सोनल दनुशाने चिवट फलंदाजी करत भारताच्या नाकात दम केला आहे. त्याने सलग दोन सेशन फलंदाजी करत भारताचा व्हाईट वॉश अवघड करून टाकला आहे. विशेष म्हणजे त्याने दोन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दनुशासाठी ट्विट केलं. त्यांनी सोनल दनुशाची सचिन तेंडलुकरशी तुलना केली.

शुक्ला आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'श्रीलंकेचा हा सोनल जबरदस्त खेळाडू आहे. तो सचिन तेंडलुकरसारखा दिसतो. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक चांगला कसोटी फलंदाज होऊ शकतो.'

दनुशाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो शतकाच्या उंबरठ्यावर असून तळातील फलंदाजांच्या साथीने तो चिवट फलंदाजी करत आहे. यामुळं सामना ड्रॉ होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने १०० आणि ८४ धावांची देखील खेळी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT