कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
चुरशीच्या अंतिम सामन्यात 'पुढारी' संघाने आसमा सांगली संघाचा पराभव करून आसमा चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. गेले दोन दिवस ही स्पर्धा महापालिकेच्या शास्त्रीनगर मैदानावर सुरू होती.
कोल्हापूर व सांगली येथील जाहिरात एजन्सी आणि विविध माध्यमे यांच्यामध्ये दरवर्षी आसमा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेअंतर्गत रविवारी एकूण पाच सामने झाले. आसमा कोल्हापूर संघ व तरुण भारत या संघात झालेल्या पहिल्या सामन्यात आसमा संघ विजेता ठरला. यानंतरच्या सामन्यात 'पुढारी' संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात केली. उपांत्य सामन्यात आसमा सांगली आणि 'पुढारी' संघांनी प्रतिस्पर्धी संघांना नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात 'पुढारी'ने आसमा सांगली संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामनावीर म्हणून निखिल कांबळे याला गौरविण्यात आले. मालिकावीर व सर्वोत्तम फलंदाजाचा किताब आसमा कोल्हापूरच्या सोहम खासबारदार याने पटकाविला. सर्वोत्तम गोलंदाज आसमा सांगली संघाचा सुधीर अनंतपूरकर ठरला.
बक्षीस वितरण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल चौगुले, आसमा अध्यक्ष सुनील बासरानी, स्पर्धा समिती अध्यक्ष अमरसिंह भोसले, आसमा उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, काका पाटील, आसमाचे सर्व संचालक, सदस्य, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक मंदूपकर यांनी, तर आभार आसमाचे सचिव संजीव चिपळूणकर यांनी मानले.
सागर मोरे (कर्णधार), नंदकुमार वाली, सचिन टिपकुर्ले, रवी कुडाळकर, गिरीश नार्वेकर, रणजित गायकवाड, सागर घाडगे, निखिल कांबळे, अनिकेत पाटील, अरुण पाटील, शुभम खेडकर, ओमकार सूर्यवंशी, स्वप्निल मिस्त्री, सुरज कांबळे