अझमतुल्लाह उमरझाई बनला सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू ESPNcricinfo
स्पोर्ट्स

अफगाणिस्तान क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण; 'हा' खेळाडू बनला वनडेतील सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू

Azmatullah Omarzai | अशी कामगिरी करणारा पहिला अफगाणी क्रिकेटपटू

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज अझमतुल्लाह उमरझाईने (Azmatullah Omarzai) इतिहास रचला आहे. आयसीसी एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणून त्याची निवड झाली आहे. अशी कामगिरी करणारा तो अफगाणिस्तानमधील पहिला खेळाडू बनला आहे. यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटच्या योगदानामध्ये मैलाचा दगड ठरलेला आहे. २०२४ मध्ये एकदिवसीय सामन्यांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अझमतुल्लाह उमरझाई यांना हा सन्मान देण्यात आला आहे. २४ वर्षीय उमरझाईला अफगाणिस्तान क्रिकेटचे भविष्य म्हटले जात आहे. त्याने आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू बनून ते सिद्ध केले आहे.

Azmatullah Omarzai | २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत

अजमतुल्लाह उमरझाईला आयसीसीकडून ज्या कामगिरीसाठी मोठा सन्मान मिळाला त्यावर एक नजर टाकूया. तो २०२४ मध्ये अफगाणिस्तानसाठी त्याने चेंडू आणि बॅटने दाखवलेल्या चमकदार कामगिरीचे त्याला बक्षीस मिळाले आहे. २४ वर्षीय अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाईने २०२४ मध्ये अफगाणिस्तानसाठी ५२.४ च्या सरासरीने आणि १०५.०६ च्या स्ट्राईक रेटने ४१७ धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे, चेंडूत त्याने २०.४ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत.

Azmatullah Omarzai | २०२४ मध्ये अफगाणिस्तानने १४ पैकी ८ जिंकले

अफगाणिस्तान २०२४ मध्ये बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि आयर्लंडविरुद्ध एकूण १४ एकदिवसीय सामने खेळेल. या १४ एकदिवसीय सामन्यांपैकी ८ सामने अफगाणिस्तानने जिंकण्यात यश मिळवले. तर २०२५ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर १ सामना अनिर्णीत राहिला. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या जवळजवळ सर्व एकदिवसीय सामन्यांमध्ये अझमतुल्लाह उमरझाई अफगाण संघाचा भाग होता आणि त्याच्या विजयांचा शिल्पकार बनला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ओमरझाईकडून अफगाणिस्तानला आशा

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. आणि, ती तिच्या कामगिरीने अनेक संघांना आश्चर्यचकित करू शकते अशी शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये अशा आत्मविश्वासाचे कारण म्हणजे अझमतुल्लाह ओमरझाईसारखे खेळाडू, जे संघाची ताकद वाढवण्यासाठी सतत काम करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT