Preity Zinta Vaibhav Suryavanshi viral photo IPL 2025 |
दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबतचे मॉर्फ केलेले फोटो पाहून बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटा भडकली. राजस्थानविरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यानंतर एका वृत्तवाहिनीने वैभव आणि प्रीती एकमेकांना मिठी मारतानाच्या छायाचित्रांवर बातमी दिली आहे, त्यावरून प्रीतीने संताप व्यक्त केला आहे.
प्रीती झिंटाने ट्विट केले आहे की, 'हा एक मॉर्फ केलेला फोटो आणि खोटी बातमी आहे. मला खूप आश्चर्य वाटते की आता वृत्तवाहिन्या देखील मॉर्फ केलेले फोटो वापरत आहेत आणि त्या बातम्या म्हणून दाखवत आहेत.
एका न्यूज वेबसाइटने बातमीला शिर्षक दिले आहे की, 'थोडी घाबरलेली, थोडी लाजलेली आणि मग... प्रीती झिंटाने वैभव सूर्यवंशीला मिठी मारली तेव्हा काय झाले?' खरतर, प्रीती आणि वैभवचा व्हिडिओ त्यांच्या अनेक फॅन पेजवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये प्रीती त्याच्याशी फक्त हस्तांदोलन करताना दिसत आहे. तर या बातमीतील छायाचित्रांमध्ये प्रीती वैभवला मिठी मारताना दिसत आहे. या गोष्टीवर प्रीती रागावली. प्रीतीच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक सोशल मीडिया वापरकर्ते राग व्यक्त करत आहेत. ते प्रीतीलाही तिने गुन्हा दाखल करावा, असा सल्ला देत आहे.
रविवारी राजस्थानविरुद्ध विजय मिळवून पंजाब किंग्जने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी केली. त्याने फक्त १६ चेंडूत ४० धावांची खेळी केली. तरीही राजस्थानला फक्त १० धावांनी सामना गमवावा लागला, सामन्यानंतर, राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत हँडल एक्सवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. फ्रँचायझीने पोस्टला "शाळेतील फ्लेक्स लेव्हल्स : वैभव सूर्यवंशी" असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, प्रीती झिंटा राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालशी बोलत आहे. त्याच्यासोबत बोलल्यानंतर, ती शशांक सिंगला सांगते की तिला सूर्यवंशीला भेटायचे आहे. त्यानंतर ती त्याला भेटते आणि हस्तांदोलन करते. सोशल मीडियावर मात्र मिठी मारताना दिसत आहे. सामन्यादरम्यान, वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी पाहून प्रीती झिंटा देखील टाळ्या वाजवताना दिसली. या फोटोवर चाहतेही सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.