श्रीजेशच्या निवृत्तीनंतर, हॉकी इंडियाने त्याला एक मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली.  Twitter
स्पोर्ट्स

ज्युनियर हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून पीआर श्रीजेशचे मोठे विधान, म्हणाला...

PR Sreejesh : पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकले. टीम इंडियाच्या या शानदार विजयात अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशची (PR Sreejesh) भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. त्याने दबावातही चांगली कामगिरी केली. हे ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच श्रीजेशने आपल्या कारकिर्दीतील ही शेवटची स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर, हॉकी इंडियाने त्याला एक मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली ज्यामध्ये त्याला भारतीय ज्युनियर हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक देखील बनवले गेले आहे. आता याबाबत श्रीजेशकडूनही मोठे वक्तव्य आले आहे.

‘कुटुंबीयांशी बोलून पुढील निर्णय घेईन’

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, ज्युनियर हॉकी संघाचा प्रशिक्षक बनवल्याबद्दल पीआर श्रीजेश म्हणाला, ‘मला हॉकी इंडियाकडून ऑफर मिळाली आहे. मी याबद्दल सरचिटणीस भोला नाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. भारतात परतल्यावर माझ्या कुटुंबीयांशी बोलून या ऑफरबाबत निर्णय घेईन.’ जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवाबाबत श्रीजेशने असेही सांगितले की, ‘जर्मनीविरुद्धचा पराभव आमच्यासाठी निश्चितच निराशाजनक होता. पण आम्ही कांस्य पदक जिंकून येत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे.’

‘दबाव कसा हाताळता यावर बरेच काही अवलंबून’

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या दबावाबाबत श्रीजेश म्हणाला, या पातळीवर तुम्ही दडपण कसे हाताळता यावर सर्व काही अवलंबून आहे. आम्ही वर्षभर हॉकी खेळतो. ऑलिम्पिक सुद्धा असेच असते पण इथे येऊन खेळल्यावर खरे दडपण जाणवते. आम्हाला यासाठी नवीन खेळाडूंना तयार करावे लागेल जेणेकरून त्यांच्यासाठी गोष्टी थोडे सोपे होतील.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT