Pat Cummins Cricket Australia Offer Pudhari
स्पोर्ट्स

Pat Cummins Contract: पॅट कमिन्सला 114 कोटी रुपये मिळणार; ऑफरनंतर IPL सोडणार का? काय निर्णय घेणार?

Pat Cummins Contract: पॅट कमिन्सला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुमारे 114 कोटी रुपयांच्या कराराची ऑफर मिळाली आहे. या ऑफरमागचा उद्देश कमिन्सने IPL आणि इतर लीगपेक्षा ऑस्ट्रेलियासाठी अधिक खेळावं हा आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pat Cummins Cricket Australia Offer: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला IPL 2026 दरम्यान मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियाने त्याचा करार पुढील तीन वर्षांसाठी वाढवण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी तब्बल 12 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 114 कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची ऑफर दिल्याचं समोर आलं आहे.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र Sydney Morning Heraldच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा उद्देश कमिन्ससारख्या स्टार खेळाडूंना फ्रँचायझी लीग क्रिकेटपेक्षा राष्ट्रीय संघासाठी अधिक खेळण्यास प्रोत्साहित करणं हा आहे. याच प्रकारची ऑफर ट्रॅव्हिस हेडलाही दिल्याचं सांगितलं जात आहे.

IPL पेक्षा जास्त कमाई?

सध्या IPL मध्ये कमिन्सची एका हंगामाची सॅलरी सुमारे 18 कोटी रुपये आहे. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ऑफर स्वीकारल्यास त्याच्या वार्षिक उत्पन्नात जवळपास 8.5 कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे त्याची वार्षिक कमाई 33 ते 34 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा गेम

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हेड ऑफ क्रिकेट जेम्स ऑलसॉप यांनी सांगितलं की, कमिन्सने दीर्घकाळ तीनही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला मोठं आर्थिक पॅकेज देणं योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं.

त्यांच्या मते, जगभरातील फ्रँचायझी लीगमुळे स्टार खेळाडूंवर व्यावसायिक दबाव वाढत आहे. त्यामुळे कमिन्स, जोश हेजलवुड आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या खेळाडूंनी लीग क्रिकेटपेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य द्यावं, ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका आहे.

कमिन्सने प्रतिक्रिया दिली नाही

या ऑफरबाबत कमिन्सने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ऑफर स्वीकारणार की IPL आणि इतर लीगमध्ये खेळणं सुरू ठेवणार, याकडे क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.

IPL 2026 मध्ये दमदार कामगिरी

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून कमिन्स IPL 2026 मध्ये खेळत आहे. आतापर्यंतच्या 4 सामन्यांत त्याने 10 विकेट घेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मैदानावरील त्याची किंमत आणि लोकप्रियता दोन्ही वाढताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT